शापोरा, साळही होणार 'राष्‍ट्रीय जलमार्ग'! केंद्रीय अहवालात घोषणा; प्रवाशांसह मालाचीही करता येणार वाहतूक

Chapora Sal National Waterways: मांडवी, झुआरी, कुंभारजुवेनंतर आता राज्‍यातील शापोरा आणि साळ या दोन्‍ही नद्यांना राष्‍ट्रीय जलमार्ग घोषित करण्‍यात येणार आहे.
Chapora Sal National Waterways
Chapora Sal National WaterwaysDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मांडवी, झुआरी, कुंभारजुवेनंतर आता राज्‍यातील शापोरा आणि साळ या दोन्‍ही नद्यांना राष्‍ट्रीय जलमार्ग घोषित करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे या दोन्‍ही नद्यांमधून प्रवाशांसह माल वाहतूकही करता येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्‍या यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात नवे राष्‍ट्रीय जलमार्ग सुरू करण्‍याची घोषणा केली होती. त्‍यात राज्‍यातील शापोरा आणि साळ या दोन नद्यांचा समावेश असल्‍याचे केंद्राच्‍या अहवालातून समोर आले आहे.

Chapora Sal National Waterways
Goa Crime: दोन खुनांनी हादरला बार्देश, कळंगुट, बोडगिणीतील घटना; मित्राच्या पत्नीचा फोटो पाहण्याचा हट्ट भोवला

रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करणे, किनारपट्टीवरील मालवाहतूक ६ वरून १२ टक्‍के वाढविणे आणि हरित लॉजिस्टिकला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पुढील पाच वर्षांत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू करण्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्‍पात केली.

आणखी २० जलमार्ग होणार सुरू : देशात सध्या १११ राष्ट्रीय जलमार्ग अधिसूचित असून, ३२ सुरू आहेत. पुढील पाच वर्षांत आणखी २० जलमार्ग सुरू होणार असल्‍याने ही संख्‍या ५२ इतकी होणार असून, माल वाहतुकीसाठी केंद्राला शापोरा आणि साळ या नद्यांचीही मदत मिळणार आहे.

Chapora Sal National Waterways
Goa Drunk And Drive: कळंगुट वाहतूक पोलिसांचा मोठा दणका! मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 165 जणांवर कारवाई; 4000 हून अधिक उल्लंघनकर्त्यांना दंड

आधीचे राष्‍ट्रीय जलमार्ग

नदी किमी वर्ष

मांडवी ४१ २०१६/१७

झुआरी ५० २०१६/१७

कुंभारजुवे १७ २०२५/२६

नवे राष्‍ट्रीय जलमार्ग

नदी किमी वर्ष

शापोरा ३३ २०२७-३०

साळ १४.०३ २०२७-३०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com