Goa Road Accident: राज्यातील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढतच असून शनिवारी सकाळच्या सत्रात शापोरा येथे एक अपघात घडल्याची माहिती मिळतेय. पुण्याहुन गोव्यात आलेल्या पर्यटकाचा आपल्या कारवरील ताबा सुटला आणि कार उलटली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान सदर पर्यटक आपली राखाडी रंगाची एमजी हेक्टर (गाडी क्र. MH 12 SL 2303) घेऊन शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास शापोरा भागातील रस्त्यावरून निघाले होते. मध्येच त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि त्याची कार रस्त्यातच उलटली.
या घटनेत ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान या स्वयं अपघातात त्या रस्त्यावरून मॉर्निंग वाॅकला जाणाऱ्या एका पादचाऱ्याला त्या कारची धडक बसल्याने तेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजतेय.
या अपघाताची हणजूण पोलीस चौकशी सुरु असून कार चालकाने मद्यपान केले आहे का याचीही चाचणी सुरु आहे. गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु झाला असून या आठवड्यात राजधानी पणजीत सेरेंडिपिटी हा कला महोत्सव सुरु आहे.
त्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडी, अपघात असेप्रकर घडत असून वाहतूक पोलीस सजगतेने आपले कर्तव्य पार पडण्याचा प्रयतन करताहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.