Valpoi News : मुलांवर लहानपणीच सुसंस्कार केल्यास ते त्यांच्यात कायमचे रूजतात : संदीप केळकर

Valpoi News : नगरगाव परिसरातील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
Valpoi
ValpoiDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News : वाळपई मुलांवर लहानपणीच संस्कार केले पाहिजे. कारण लहान वयामध्ये केलेले संस्कार त्यांच्या मनापर्यंत खोलवर रुजून जातात व त्यातूनच पुढे मग चांगले नागरिक घडतात असे प्रतिपादन गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप केळकर यांनी केले.

ते गोमंतक मराठी साहित्य परिषदेतर्फे‘दिवाळी शुभेच्छापत्र’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात नगरगाव येथे बोलत होते. सदर स्पर्धा नगरगाव प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी घेण्यात आली. नगरगाव परिसरातील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

या स्पर्धेतील विजेत्या मुलांना मराठी भाषेतील संस्कारक्षम गोष्टींची पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. सविस्तर निकाल प्रथम पूर्वी माऊसकर, द्वितीय करिष्मा गावकर, तिसरे बक्षीस लावण्या नाईक व विवेक गायकवाड या दोघांना तर चौथे पारितोषिक श्रुती रामकृष्ण गावकर यांना प्राप्त झाले.

Valpoi
Old Goa News : ‘हात कात्रो खांब’ पूर्ववत करण्याच्या कामास सुरवात

नगरगाव प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नयन बर्वे तसेच त्यांचे सहयोगी शिक्षक किशोर केळकर व चित्रा गावठणकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांना ‘परब्रम्ह’चे संदेश केळकर यांनी सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com