दाबोळी विमानतळावरील जाहिरात कंत्राटात भ्रष्टाचार, माजी कार्यकारी संचालकांविरोधात CBI कडून गुन्हा

कंपनीला विमानतळावर जाहिरात सवलतीचा करार मिळवा यासाठी मदत करून अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाहिरात कंत्राट मिळावे यासाठी कंपनीला मदत आणि प्राधान्य दिल्याप्रकरणी CBI कडून भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) माजी कार्यकारी संचालक (व्यावसायिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने माजी कार्यकारी संचालकांविरोधात फसवणूक, गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे माजी कार्यकारी संचालक (व्यावसायिक) रामेंद्र कुमार सिंग जाहिरात कंपनी M/s TDI इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आणि अज्ञात लोकसेवक यांच्याविरोधात यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

माजी कार्यकारी संचालक रामेंद्र कुमार सिंग आणि AAI च्या इतर अधिकार्‍यांनी फर्मसोबत गुन्हेगारी कट रचला. तसेच, 2018 मध्ये गोवा विमानतळावर जाहिरात सवलतीचा करार मिळवा यासाठी मदत करून अधिकृत पदाचा गैरवापर केला. असे एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे.

दरम्यान, या कंपनीचा 2009 ते 2013 दरम्यान AAI सोबत पूर्वीचा जाहिरात सवलत करार होता, त्यात विमानतळ प्राधिकरणाचे 2.61 कोटी रुपये बाकी होते, तरीही कंपनीला नवीन करार देण्यात आला. असेही FIR मध्ये म्हटले आहे.

Dabolim Airport
लग्नासाठी काढलेले 15 लाखांचे कर्ज कॅसिनोत उधळले, कुडचडेतील नवरदेवाचा विवाह पुढे ढकलला

2017 मध्ये दाबोळी विमानतळावर मास्टर जाहिरात कंत्राट देण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. यासाठी मेसर्स आर्क आउटडोअर मीडिया आणि गुन्हा दाखल झालेली जाहिरात फर्म देखील सहभागी झाली होती. निविदेसाठी बोली उघडल्यानंतर, नंतरच्या सर्वांना तांत्रिकदृष्ट्या अपात्र घोषित करण्यात आले.

आर्क मीडियाला तांत्रिकदृष्ट्या पात्र घोषित करण्यात आले होते त्यासाठी 26 मे 2017 रोजी बोली उघडण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु सिंग यांच्या निर्देशानुसार ते टाळण्यात आले. असेही FIR मध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी AAI च्या कर्मचार्‍यांना कायदेशीर सल्ला घेण्याची शिफारस केली होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. तसेच, RFP अटींचे उल्लंघन करून कंपनीला डिसेंबर 2018 मध्ये कंत्राट देण्यात आले. असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com