पणजी: मडगाव (Margao) येथील एका इमारतीच्या बंद खोलीत सुरू असलेल्या बेकायदा कॅसिनोवर (Goa Casino) गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पथकाने छापा टाकून 12 जणांना अटक केली. तसेच कॅसिनो (Casino) जुगारासाठीच्या चिप्स, कॅसिनो यंत्रे, रोख रक्कम व मोबाईल्स मिळून सुमारे 84 लाखांचा माल जप्त केला. हा कॅसिनो संशयित रेहान मुजावर चालवत होता.
नावेली येथील रेहान हा गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदा कॅसिनो चालवत होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॅसिनो बंद असताना तो खुलेआम कॅसिनो चालवत असल्याने हा गुन्हा ठरला आहे. या कॅसिनोविरोधात स्थानिकांकडून तक्रारीही दाखल झाल्या होत्या. त्यामुळे क्राईम ब्रँचच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. कॅसिनोचा चालक रेहन मुजावर याने दहा तरुणांना तेथे कामाला ठेवले होते. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे किस्मत कामत, रिषभ नाईक, सेल्विन कुलासो, आकाश खुटकर, इव्हान रॉड्रिगीस, शैलेश वेळीप, श्रीपाद उत्तम नाईक, रुपेश बांदेकर अशी आहेत.
हे सर्वजण कॅसिनो जुगाराची यंत्रे चालविण्याचे काम करत होते. तसेच या ठिकाणी जुगार खेळण्यास आलेले निझामुद्दिन मसूर, अरिफ हन्सीमरड, सरवर सय्यद, रिझवान सय्यद, दुपेंद्र पून, अस्लम खान, मुस्तफा शेख, जोझ परेरा, सर्फराज खान, सय्यद शेख, झहिर खानापुरी यांचा समावेश आहे. या ठिकाणी अंदर बाहर, ब्लॅक जॅक तसेच फिरत्या कॅसिनो मशीनवर जुगार सुरू होता. या सर्वांना पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांची सुटका करण्यात आली. पोलिस निरीक्षक सतीश गावडे, निरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक गिरिश पाडलोस्कर, हवादार संतोष गोवेकर, कॉन्स्टेबल गौरिश नाईक व संकल्प नाईक या पथकाने ही कारवाई केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.