Panaji E-bus service: पणजीत ई-बस सेवेला गोमंतकीयांचा भरभरुन प्रतिसाद; रोज 'एवढे' हजार लोक करतायेत प्रवास!

E-bus service: पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत ई-बस सेवा जुलैमध्ये सुरू झाली होती. ऑगस्टच्या अखेरीस २.२२ लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
Panaji E-bus service: पणजीत ई-बस सेवेला गोमंतकीयांचा भरभरुन प्रतिसाद; रोज 'एवढे' हजार लोक करतायेत प्रवास!
Panaji E-bus serviceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत ई-बस सेवा जुलैमध्ये सुरू झाली होती. ऑगस्टच्या अखेरीस २.२२ लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. दैनंदिन सरासरी ३,६०० प्रवासी या बसेसमध्ये प्रवास करत असल्याचे सिद्ध होते. ही सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून याच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. जुलैमध्ये एकूण प्रवासी संख्या ७०,७०४ होती, तर ऑगस्टमध्ये १,५२,०६६ प्रवाशांची वाढ झाली.

ई-बस सेवेला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हा शहराच्या शाश्वत शहरी गतिशीलतेच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. स्मार्ट सिटी उपक्रमाने एकूण ४८ ई-बस तैनात केल्या आहेत, ज्या सात रंग-कोडित मार्गांवर चालत. आम्ही पणजीच्या हिरवाईच्या अधिक कार्यक्षम भविष्याकडे वाटचाल करत आहोत, असे स्मार्ट सिटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

१ जुलैपासून सुरू झालेला पिवळा मार्ग हा सेवेचा कणा आहे. पाटो प्लाझा, गोवा विद्यापीठ, बांबोळी आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय अशा प्रमुख ठिकाणांद्वारे पणजी बस स्थानक, दोनापावलला जोडणारा रस्ता, ४४ थांब्यांसह २४ किलोमीटर टप्पा गाठते. या मार्गावर १२ मीटरच्या मोठ्या बसेस मोठ्या संख्येने प्रवाशांना सामावून घेतात.

Panaji E-bus service: पणजीत ई-बस सेवेला गोमंतकीयांचा भरभरुन प्रतिसाद; रोज 'एवढे' हजार लोक करतायेत प्रवास!
E-Bus Service In Panjim: सहा इलेक्ट्रिक बसगाड्यांचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन

सेंट्रल पणजी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निळ्या मार्गावरील सेवा १९ जुलै रोजी सुरू झाली होती. शहराच्या मध्यभागी १० किलोमीटरचा प्रवास करते आणि ३० मिनिटांत प्रवास पूर्ण करते. ३२ थांब्यांसह आझाद मैदान, औषध महाविद्यालय आणि जुना पाटो पूल सारख्या भागात सेवा देते. निळ्या मार्गाला पूरक हा हिरवा मार्ग आहे, जो १९ जुलै रोजी देखील सुरू करण्यात आला आहे. २२ थांब्यांसह हा नऊ किलोमीटरचा मार्ग महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com