Goa News: गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी! राज्यात काजू, आंबा पीक मिळणार समाधानकारक, कृषी संचालनालयाने दिली माहिती

Goa Agriculture News: यंदा मागील दोन महिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात थंडी कायम असल्याने आंबा काजूला चांगला मोहोर आला आहे. काही भागात आता काजू पीक घ्यायला सुरूवात झाली आहे.
Goa cashew production, Goa mango crop
Goa cashew production, Goa mango cropDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात गेल्या पाच वर्षात काजू लागवड क्षेत्रफळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे परंतु, उत्पादनात सातत्‍त्याने घट होत आहे. सतत होणाऱ्या हवामान बदलांचा परिणाम काजू, आंबा व इतर पीकांवर होत आहे.

परंतु, यंदा मागील दोन महिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात थंडी कायम असल्याने आंबा काजूला चांगला मोहोर आला आहे. काही भागात आता काजू पीक घ्यायला सुरूवात झाली आहे.

Goa cashew production, Goa mango crop
Mankurad Mango: मानकुराद बाजारात आला; पण दर ऐकून हिरमोड झाला! एका डझनासाठी मोजावे लागतायत 'इतके' हजार

त्यामुळे यंदा राज्यात काजू आणि आंब्याची पीक समाधानकारक मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे कृषी संचालनालयाचे उपसंचालक दत्तप्रसाद देसाई यांनी सांगितले. देसाई म्हणाले, राज्यात सध्या काजूची जूनी झाडे आहेत आता नव्याने लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. लागवड ही प्रामुख्याने कलमी काजूची केली असल्याने येत्या काही वर्षात काजूचे उत्पादनात पुन्हा वाढ होईल.

Goa cashew production, Goa mango crop
Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

पंधरा दिवसांत काजू मिळतील

सत्तरी तालुक्यातील काही भागात आता कमी प्रमाणात काजू बोंडू देखील आले असून नव्या काजू पिकाला सुरूवात झाली आहे. येत्या पंधरा दिवसात काजू हंगामाला सुरूवात होईल. राज्यातील फेणी उत्पादक देखील हंगामाच्या अनुषंगाने तयारीला लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com