Sameer Panditrao
गोव्यात काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. पणजी बाजारात ओले काजूगर आणि काजू बोंडू विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
ओले काजूगर ४०० रुपयांना शंभर दराने विकले जात आहेत. खवय्ये मोठ्या प्रमाणात हे ताजे काजूगर खरेदी करत आहेत.
फक्त काही मोजकेच स्थानिक विक्रेते हे ताजे काजू विकत आहेत, त्यामुळे त्यांच्या स्टॉल्सना चांगलीच गर्दी आहे.
ओल्या काजूगरांसोबतच सुके काजूगरही प्रतिवाटा २५० रुपयांना विकले जात असून ग्राहक त्यांनाही चांगला प्रतिसाद देत आहेत.
काजूगरांसोबत काजू बोंडूदेखील बाजारात आले आहेत. हे बोंडू शहरी नागरिक खास खरेदी करताना दिसतात.
काजू बोंडूंना मिरची पावडर आणि मीठ लावून खाणे अनेकांना आवडते. त्यामुळे त्यांची विक्री चांगली होत आहे.
काजू बोंडू १० ते १५ रुपयांना विकले जात असून स्थानिक आणि पर्यटक त्यांचा आनंद घेत आहेत.