Goa Cashew Production: शेतकऱ्यांकडून 'काजूबिया' खरेदी बंद, बागायतदार संकटात; काजू उत्पादनात 40 टक्के घट

goa cashew production decline 2026: बागायतदार बाजार संस्थेने काजूबिया खरेदी बंद केल्याने डिचोली तालुक्यातील अनेक काजू बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
Goa Cashew Production
Goa Cashew ProductionDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: बागायतदार बाजार संस्थेने काजूबिया खरेदी बंद केल्याने डिचोली तालुक्यातील अनेक काजू बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. संस्थेकडून खरेदी थांबताच बाजारातील दर घसरल्याने बागायतदारांना काजूबिया कमी दराने विकण्याची वेळ आली आहे.

मेअखेरपर्यंत बागायतदारकडून काजूबियांची खरेदी केली जात होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातही बागायतदारांना समाधानकारक दर मिळत होता.

मात्र, यंदा संस्थेने सुमारे पंधरा दिवस आधीच खरेदी बंद केल्याने उत्पादकांना खासगी व्यापाऱ्यांचा आधार घ्यावा लागला. परिणामी, काजूबियांना अपेक्षित भाव मिळाला नाही.

Goa Cashew Production
Goa Politics: फोंड्यात राजकीय अनिश्चिततेचे ढग, उमेदवारीच्या चर्चांना वेग; काँग्रेस आघाडीवर, भाजप-मगोची भूमिका अस्पष्ट

दरात घसरण!

नार्वे येथील बागायतदार तथा संस्थेचे सभासद सत्यवान चोडणकर यांनी सांगितले की, बागायतदार बाजारने खरेदी बंद करताच बाजारातील दर कोसळले. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील उत्पादन कमी दरात विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com