Goa Carnival 2024: दरवर्षी गोमंतकियांचे आकर्षण असणार कार्निव्हल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय. यंदा 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत राज्यात कार्निव्हलची धूम पाहायला मिळणार आहे.
09 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज पर्वरीत फ्लोट परेड असेल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री रोहने खंवटे यांनी दिली.
पणजीत 10 फेब्रुवारीला तर मडगावमध्ये 11 फेब्रुवारीला कार्निव्हल होणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी मडगावातील होली स्पिरीट चर्च ते पालिका इमारत चौक या पारंपरिक मार्गावरुन कार्निव्हल मिरवणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या मिरवणुकीत इंडियन नेव्हीच्या चित्ररथाचे खास आकर्षण असणार असून १२ फेब्रुवारी रोजी म्युझिकल शोचे आयोजन करण्यात आले आहे.
वास्कोत 12 फेब्रुवारीला आणि 13 फेब्रुवारी रोजी म्हापसात कार्निव्हलचे फ्लोट मार्च करतील अशी माहिती पर्यटन मंत्री खंवटे यांनी दिली होती.
या कार्निव्हलकडे गोमंतकियांचे लक्ष लागून राहिले असून मागील वर्षीही याच मार्गाने ही मिरवणूक झाली होती. होली स्पिरिट चर्च ते मडगाव नगरपालिका चौक येथे रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून लोकांनी चित्ररथ मिरवणुकीचा आनंद लुटला होता.
वाहतुकीत बदल:-
दरम्यान मडगावात होणाऱ्या या कार्निव्हलसाठी वाहतूक मार्गात बदल होणार की नाही याची माहिती अद्याप हाती आली नाहीय. मात्र पालिका आणि वाहतूक पोलिसांनी या कामासाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती समजली आहे.
एरव्ही मडगावात कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक होली स्पिरिट चर्च ते नगरपालिका चौकपर्यंत आयोजित व्हायची.
गेली चार वर्षे ही मिरवणूक ओल्ड मार्केटमधील एसजीपीडीए मैदान ते रवीन्द्र भवन मार्गे फातोर्डा येथील बोरकर सुपर स्टोअर्सपर्यंत आयोजित करण्यात आली होती.
यंदा मडगावातील होली स्पिरीट चर्च ते पालिका इमारत चौक या पारंपरिक मार्गावरुन कार्निव्हल मिरवणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.