Goa News: लोलये पंचायतीत मनोज प्रभुगावकरांची निवड

Goa News: लोलयेत जैवविविधता समितीच्या अध्यक्षपदी मनोज प्रभू गावकर यांची निवड करण्यात आली.
Goa News | Lolaye Panchayat
Goa News | Lolaye PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: काणकोण तालुक्यातील सर्व सातही पंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीस्थळ पंचायत वगळता सर्व पंचायतींमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा होऊन समित्यांची निवड करण्यात आली.

लोलयेत जैवविविधता समितीच्या अध्यक्षपदी मनोज प्रभू गावकर यांची निवड करण्यात आली. पैंगीणमध्ये सुभाष महाले यांची फेरनिवड करण्यात आली. या समितीवर गजानन बांदेकर, विराज पै खोत, वैजयंती प्रभुगावकर, संजय गावकर, कल्पना भट आणि सचिवपदी पंचायत सचिव राजीव नाईक गावकर यांची निवड करण्यात आली.

Goa News | Lolaye Panchayat
Goa News: फोंड्यातील सहा पाणथळांसाठी मंडळाकडून मसुदा अधिसूचित!

पंचायत संचालनालयाने काल जैवविविधता समितीचे पुनर्गठन हा एकमेव विषय घेऊन ग्रामसभा बोलावण्याचे निर्देश राज्यभरातील पंचायतींना दिले होते. या समितीत सात सदस्यांचा समावेश असून एक महिला, एसटी, एसी घटकांचा एक सदस्याचा समावेश अनिवार्य आहे.

पैंगीणच्या समितीत सरपंच सविता तवडकर आणि उपसरपंच सुनील पैंगणकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्याचा ठराव घेण्यात आला. या समितीचा कार्यकाळ पाच वर्षाचा असेल. खोतीगाव जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत देसाई यांची निवड करण्यात आली.

बैठकीला ग्रामस्थांनी उपस्थिती लावली व खेळीमेळीच्या वातावरणात समितीची निवड करण्यात आली, असे सरपंच आनंदु देसाई यांनी सांगितले.

Goa News | Lolaye Panchayat
Goa First: गोवा शिपयार्डची 'ती' भिंत हटवणे आवश्यक

श्रीस्थळची सभा केली तहकूब

श्रीस्थळ येथे विनय तुबकी यांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता समिती कार्यरत होती. या समितीने अनेक पुरस्कार प्राप्त केले. कोरोना महामारीच्या काळातही या समितीने भरीव काम केले. मात्र, आज दोन गट पडल्याने ही सभा तहकूब करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com