Goa Municipality: वाळपई गेल्या काही दिवसापासून पाऊस पडून सतत शहरात पूरस्थिती निर्माण होत आहे. अखेर आज पालिकेला जाग आली. या सदर्भांत महत्वाची बैठक घेऊन पालिकामंडळासोबत पूरस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
उपाययोजनांसंबंधी बांधकाम खात्याचे अधिकारी गुरुदास गोखले यांच्याशी विविध स्तरावर चर्चा करण्यात आली. सध्या पावसाची रिपरिप असल्यामुळे पुन्हा पूरसदृश्य स्थिती उद्भवल्यास शहरात 24 तास कामगार तैनात ठेवण्यात येणार आहेत.
काल वाळपई पालिका सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सेहझीन शेख, पालिका अधिकारी सूर्याजीराव राणे, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, नगरसेवक रामदास शिरोडकर, विनोद हळदणकर, वसईउद्दीन शेख, फैजल शेख, नगरसेविका प्रसन्ना गावस, निर्मला साखळकर, अभियंता जयेश कलंगुटकर व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयासमोर दोनवेळा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. हनुमान मंदिरानजीक पाणी तुंबल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसून घरातील साहित्याची हानी झाली. प्रभाग तीन व मासोर्डे भागातही चिंताजनक स्थिती उद्भवली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भात उपाययोजना करण्यावर एकमत करण्यात आले.
नगरसेवक रामदास शिरोडकर म्हणाले,की वीस वर्षांपूर्वी शहरातील गटारे बांधलेली आहेत. सध्यातरी ही गटारे अपुरी ठरत असून यामुळे पाण्याचा प्रवाह गटाराच्या बाहेरून जातो व गंभीर स्थिती निर्माण होते. विनोद हळदणकर म्हणाले,की अनेक ठिकाणी सदर गटारे उघडी आहेत. त्यावर लाद्या घालून बंद करण्यात यावीत.
गुरुदास गोखले, कनिष्ठ अभियंता, साबांखा-
वाळपई शहरातील प्रमुख रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. मात्र, अंतर्गत रस्ते पालिकेचे जबाबदारी आहे. तसेच पालिका क्षेत्रात कमकुवत असलेल्या पुलासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.