Goa News: गालजीबाग नदी पात्र होतेय अरुंद

Goa News: झाडेझुडपे वाढली : गाळ उपसण्याची गरज; मासेमारीवरही मर्यादा
Galjibag River| Goa News
Galjibag River| Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: पैंगीण व लोलये पंचायत क्षेत्रातील जलसंचय स्त्रोत असलेल्या गालजीबाग नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहे. त्यासाठी नदीचे पात्र गाळमुक्त करण्याबरोबरच नदीच्या दोन्ही तटावरील झाडांची छाटणी करण्याची गरज आहे. दोन्ही तटावर झाडे वाढून पात्र अरुंद बनत आहे.

एकेकाळी गालजीबाग येथून समुद्रातून माल वाहतूक करणाऱ्या होड्या पैंगीण बाजारापर्यंत येत होत्या. मात्र, आता भटा बांधाच्या वरच्या बाजूचे पात्र अरुंद झाले आहे. एका पाहणीनुसार तळपण नदीपाठोपाठ गालजीबाग नदीच्या पाण्याचा स्तर खालावला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अविघटनशील कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे दरवर्षी वरच्या पात्रातील मासेमारीवरही मर्यादा पडली आहे.

Galjibag River| Goa News
Sonsodo Project : सोनसोडोवरील जुन्या कचऱ्याचा ढीग फेब्रुवारीपर्यंत साफ करणार

नदीच्या तटाची बांधणी करणार :

काणकोणात आलेल्या 2009 च्या पुरामुळे गालजीबाग नदीच्या तटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीच्या पैंगीण बाजूकडील सुमारे 1,100 मीटर लांबीच्या तटाची बांधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जलस्त्रोत खात्याने 4 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, असे पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगीणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com