Sonsodo Project : सोनसोडोवरील जुन्या कचऱ्याचा ढीग फेब्रुवारीपर्यंत साफ करणार

मात्र दैनंदिन कचऱ्याचे काय करायचे त्यावर मडगाव पालिकेलाच काढावा लागेल उपाय
Sonsodo Project
Sonsodo ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

Sonsodo Project : सोनसोडो कचरा प्रकल्पाच्या बाहेर जुन्या कचऱ्याचा जो ढीग आहे तो येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत साफ केला जाईल असे कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेविन्सन मार्टिन्स यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मडगाव शहरात रोजच्या रोज जो कचरा तयार होतो त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी मडगाव पालिकेचीच असणार हे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सध्या सोनसोडोवरील कचरा प्रकल्पात साठवून ठेवलेल्या ओल्या कचऱ्याचा ढीग वाढल्याने आमदार दिगंबर कामत यांनी आज शुक्रवारी मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यासह या प्रकल्पाची पाहणी केली.

Sonsodo Project
Ponda Robbery : छंदापोटी गोव्यात लुटालूट; फोंड्यात चोरीप्रकरणी महाराष्ट्रातील दोघांना बेड्या

प्रकल्पात साठलेल्या या कचऱ्यावर होणारी प्रक्रिया ठप्प झाल्याने मडगाव येथील कचरा साळगाव प्रक्रिया प्रकल्पात नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला नकार दिल्याने पालिकेसमोर पेच निर्माण झाला होता.

त्यामुळे आज कामत यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात कचऱ्याची चाळण करणारी क्रेन मागचे आठ महिने बंद पडल्याने हा रोजचा कचरा पडून राहतो. या कचऱ्याची चाळण करण्यासाठीं या पुढे पोकलेनचा वापर करावा अशी सूचना यावेळी करण्यात आली.

Sonsodo Project
No Leaves to Goa Police : इफ्फीच्या काळात गोवा पोलीस 'ऑन ड्युटी'; रजा मिळणार नाही

दरम्यान या प्रकल्पाची मोडलेली शेड परत बांधणे आणि मोडलेली यंत्रसामग्री बदलणे यासाठी त्वरित दोन निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी यापुढे झालेल्या कामाचा आढावा दर पंधरा दिवसांनी घेण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले. मार्टिन्स हे स्वतः दर 15 दिवसांनी या प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतील असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान या प्रकल्पाच्या जागेवर असलेल्या सुक्या कचऱ्याचे जलद पद्धतीने बेलिंग व्हावे यासाठी सोनसोडो प्रकल्पावर तिसरे बेलींग मशीन सुरू करण्यात आले असून लवकरच चौथे मशीन बसविण्यात येणार आहे. तसेच नेसाय औद्योगिक वसाहतीत बंद पडलेली दोन मशिन्स आजपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती कामत यांनी दिली. या प्रकल्पातील जुना कचरा पूर्णतः साफ केल्यावर रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीं बायो डायजेस्टर बसविण्यात येणार असल्याचे मार्टिन्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com