
Calangute Crime सध्या गोव्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून यात स्थानिकांसह पर्यटनासाठी येणाऱ्या परप्रांतियांचाही हात असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना रविवारी कळंगुट येथे घडलीय.
कळंगुटमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारचा थरार पाहायला मिळाला. बंगळूर आणि कारवार येथून पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या दोघांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराच्या अंगावर कार चढ़वल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
उपलब्ध झालेल्या माहिती नुसार पोलीस हवालदार विद्यानंद आमोणकर ड्युटीवर असताना त्यांना फेअरफिल्ड, मॅरियट हॉटेल नजीक लाल रंगाची टाटा टियागो कार (KA 04 BN 8391) उभी असल्याचे आढळून आली. यावेळी त्यांना या गाडीतील पर्यटक अनैतिक काम करत असल्याचा संशय आला.
त्यानुसार आमोणकर यांनी कारजवळ जाऊन गाडीतील दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्याला पकडले आहे हे लक्षात येताच ड्रायव्हर शेजारच्या व्यक्तीने दरवाजा उघडून गाडीच्या मागच्या बाजूने पळ काढला.
आमोणकर यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून पकडले. हे पाहून गाडीच्या ड्रायव्हरने आपली कार बेदरकारपणे रिव्हर्स घेऊन आमोणकर यांच्या अंगावर चढवत त्यांना काही अंतरावर फरफटत नेले.
मात्र गस्तीवर असलेल्या अमीर गरड व विजय नाईक या दोघा पोलिसांनी दोन्ही पर्यटकांना ताब्यात घेतले. या घटनेत आमोणकर हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी संशयित आरोपी वसंत मडिवाल (कारवार) सुंदीपकुमार एम.(रा. बंगळूर) या दोघांना पोलिसांनी अटक केलीय.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.