Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress: कळंगुट बनलेय अवैध धंद्यांचे केंद्रस्थान, सरकार मात्र स्तब्ध

काँग्रेसचा आरोप: मुख्यमंत्र्यांपासून पंचायतींना पोहचतात त्यांचे कथित हिस्से
Published on

Goa Congress म्हापसा कळंगुट मतदारसंघात अवैद्य धंदे फोफावले असून, मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक पंचायतींना याचे कथित हिस्से पोहचत असल्याने हे प्रकार बंद होत नाहीत. मुख्यतः कळंगुट क्षेत्र सध्या बेकायदेशीर कृत्यांचे केंद्रस्थान (रिंग) बनले आहे, असा आरोप कळंगुट काँग्रेस गट समितीने केला.

सोमवारी (ता.७) येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला या गट समितीचे अध्यक्ष लॉरेन्सो सिल्वेरा, गोवा प्रदेश युवा काँग्रेस उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा, सुदिन नाईक, राजन कोरगांवकर, राजेश कांदोळकर, सचिन वेंगुर्लेकर, ज्यो डिकोस्ता व इतर उपस्थित होते.

Goa Congress
Stray Cattle In Sattari: वाळपईत वाहनचालकांसमोर उद्भवलीय 'ही' समस्या, आठवडी बाजारातही सहन करावा लागतोय त्रास

विवेक डिसिल्वा म्हणाले की, कळंगुट क्षेत्रात राजरोजपणे बेकायदेशीर धंदे सुरू आहेत. वेश्या व्यवसाय तसेच कथित डान्सबारच्या नावाने पर्यटकांची लुबाडणूक होत आहे. सध्या कळंगुटमध्ये स्थानिक पंचायत, आमदारापासून सरकार सुद्धा भाजपाचेच आहे.

तरीही या बेकायदा गोष्टींवर कुणाचेच नियंत्रण नाही. यासंदर्भात समितीकडून स्थानिक पोलिस निरीक्षकांना लवकरच निवेदन सादर केले जाईल, असेही ते म्हणाले.

Goa Congress
Valpoi पोलिस क्वॉर्टर्सच्या इमारती मोजताहेत शेवटची घटका, कोणत्याही क्षणी दोन्ही इमारती जमीनदोस्त होण्याची भीती

लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज !

मुख्यमंत्री, स्थानिक पंचायत तसेच आमदारांना या बेकायदा गोष्टींचे हफ्ते (हिस्सा) पोहचत असल्याचा आरोप सुदिन नाईक यांनी केला. सत्ताधारी लोकप्रतिनिधी तसेच सरकार फक्त रडण्याचे केवळ ढोंग करीत आहे.

आमदार हे काही स्थानिकांना घेऊन याविषयी मुख्यमंत्र्यांना भेटणार असे सांगतात. मुळात आमदार हे भाजपाचे तर पंचायत मंडळावर भाजपाचे वर्चस्व आहे, मग हा अवैध प्रकार कसा थांबवत नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुळात स्थानिकांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना याविषयी जाब विचारण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com