Goa Crime: हणजूणमध्ये 10 लाखांचे ड्रग्स जप्त

Goa Crime: किनारी भागात रात्री संगीतरजनी क्लबवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: ड्रग्सविरोधी पथकाने गुरुवारी 6 ऑक्टोबरला मध्यरात्रीनंतर हणजूण येथील एका क्लबच्या आवारात घातलेल्या छाप्यात टांझानियन महिलेला अटक केली. तिच्याकडून हेरॉईन, एमडीएमए व एक्सटसी पावडर जप्त केली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्सची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. तिने हे ड्रग्स कोणाकडून विकत घेतले, याचा शोध सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक अल्बुकर्क यांनी दिली. या महिलेचा पासपोर्ट तसेच व्हिसा मुदत यांची चौकशी करण्यात येत आहे.

Goa Crime
Goa News: नागोवा पंचायतीद्वारे परप्रांतीयांच्या माहितीचे 'ॲपद्वारे' संकलन!

तसेच, ही कारवाई पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना, उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरुण देसाई यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गरोडी, कॉन्स्टेबल नितेश मुळगावकर, रूपेश कांदोळकर, मंदार नाईक, सुदिन लिंगुडकर, पूजा सावळ देसाई यांच्या सहकार्याने केली.

क्लब, पबवर नजर

किनारी भागात रात्री संगीतरजनी सुरू असलेले क्लब तसेच पब्सवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे. अशा ठिकाणी काहीजण ड्रग्स विक्रीसाठी वावरत असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील ड्रग्स विक्रेते व दलालांचा बीमोड करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर पोलिस सक्रिय झाले आहेत.

Goa Crime
Goa Petrol Price: अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत वाढ, जाणून घ्या गोव्यातील दर...

संशयास्पद वागणूक

या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विदेशी महिला हणजूण येथे अनेक देशी- विदेशी पर्यटकांशी संवाद साधताना दिसली. तिच्या या वागणुकीमुळे संशय आल्याने महिला पोलिसांच्या मदतीने तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे 50 ग्रॅम हेरॉईन, 20 ग्रॅम एमडीएमए आणि 30 ग्रॅम एक्सटसी पावडर सापडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com