Calangute Drowning: मित्र नको म्हणाले तरी समुद्रात गेला, मोठी लाट आली आणि घात झाला; मणिपूरचा युवक कळंगुट किनाऱ्यावर बुडाला

Goa Drowning Case: गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मणिपूरमधील टी. सपुलू (वय १९) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Drowning Case
Drowning CaseDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मणिपूरमधील टी. सपुलू (वय १९) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मित्रांचा गट कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. सपुलूने एकट्याने समुद्रात पोहण्यासाठी उतरण्याचा हट्ट धरला. मित्रांनी त्याला समुद्रात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकला नाही. पोहत असतानाच अचानक मोठी लाट आली आणि त्याला समुद्राच्या खोल भागात ओढून नेले.

Drowning Case
Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

सुमारे अर्ध्या तासानंतर सपुलूचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉ (गोवा वैद्यकीय महाविद्यालय) रुग्णालयात पाठवला.

Drowning Case
Tragic Death: चिमुकलीने गिळला जिवंत मासा, बस्तोड्यातील दुर्दैवी घटना; 6 वर्षाच्या बाळाचा मृत्यू

दरम्यान, सपुलू हा आपल्या इतर तीन मित्रांसह कांदोळी परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला होता, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी पर्यटकांना समुद्रातील सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com