Goa Cabinet Reshuffle: देर आए दुरुस्त आए! सिक्वेरांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर दिगंबर कामत म्हणाले...

मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळेच मी राजीनामा दिला; काब्रालांची माहिती
Goa Cabinet Reshuffle | Nilesh Cabral Dismissed
Goa Cabinet Reshuffle | Nilesh Cabral DismissedDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cabinet Reshuffle: नीलेश काब्राल यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आता मंत्रिमंडळामध्ये आलेक्स सिक्वेरा यांची वर्णी लागणार असून आज (रविवार) संध्याकाळी 7 वाजता राजभवनामध्ये त्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे.

Goa Cabinet Reshuffle | Nilesh Cabral Dismissed
Goa Updates 19 November: काब्राल यांचा राजीनामा ते सिक्वेरा यांचा शपथविधी... एका क्लिकवर जाणून घ्या गोव्यात दिवसभरात काय घडले?

यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, नीलेश काब्राल यांचा राजीनामा मी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींनी दिला होता.

देर आए दुरुस्त आए....

आलेक्स सिक्वेरांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार ही माहिती वाऱ्यासारखी राज्यभरात पसरल्यानंतर दिगंबर कामत यांनी सिक्वेरांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर सद्यस्थितीवर भाष्य करत कामत म्हणाले की, ही गोष्ट घडण्यासाठी बराच कालावधी गेला; पण हरकत नाही, हे व्हायचेच होते. याबद्दल मी खूप खुश आहे. मी सिक्वेरांचे मनापासून अभिनंदन करतो. जरा उशिरानेच का होईना पण अखेर ते मंत्रिमंडळामध्ये सामील होत आहेत.

याबाबत पत्रकारांनी त्यांच्या मंत्रीपदाबद्दल विचारले असता, सारवासारव करत कामत म्हणाले की, मी सध्याच्या राजकीय निर्णयावर खुश आहे. माझ्याबद्दलचा निर्णय योग्यवेळी पक्षातर्फे घेतला जाईल.

राजीनाम्यानंतर नीलेश काब्रालांनी काढली मनोहर पर्रीकर यांची आठवण!

राजीनामा दिल्यानंतर निलेश काब्राल यांंनी स्व. मनोहर पर्रीकर यांची आठवण काढली. ते म्हणाले की, मी पर्रीकरांच्या मार्गदर्शनामुळेच राजकारणामध्ये उतरलो. मी कार्यरत असताना माझ्या कालावधीमध्ये मी कधीही सरकारी सुविधांचा वापर केला नाही. मात्र राजकारणात नेहमीच घडामोडी घडत असतात. सध्या मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळेच मी राजीनामा दिला आहे.

सध्याच्या राजकीय स्थितीवर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com