Goa : माल खरेदी करा आता ‘व्‍हॉट्‍स ॲप’द्वारे

Goa : गोवा बागायतदारकडून ‘व्हॉटस्ॲप माल मागणी’ योजना
Goa : Ponda: Giving information about the schemes started by Goa Bagayatdar by Adv. Narendra Sawaikar. Along with Nitin Samant and Ulhas Umre.
Goa : Ponda: Giving information about the schemes started by Goa Bagayatdar by Adv. Narendra Sawaikar. Along with Nitin Samant and Ulhas Umre.Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : कोरोनापासून बचाव (Covid Awareness) आणि गर्दी (Rush) टाळण्यासाठी गोवा बागायतदार (Goa Bagayatdar) संस्थेने आता ग्राहकांसाठी ‘व्हॉटस्ॲप माल मागणी’ योजना सुरू केली आहे. राज्यातील गोवा बागायतदारच्या सर्व मार्केट मॉलमध्ये (Market Mall) ही योजना लागू केली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना खरेदीत सुटसुटीतपणा येईल. तसेच संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाही दूर ठेवू, असा विश्‍वास गोवा बागायतदारचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केला. फोंड्यात गोवा बागायतदारतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष नितीन सामंत तसेच व्यवस्थापकीय संचालक उल्हास उमर्ये यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

Goa : Ponda: Giving information about the schemes started by Goa Bagayatdar by Adv. Narendra Sawaikar. Along with Nitin Samant and Ulhas Umre.
Goa: डिचोलीतील 'ती तीन घरे' अखेर प्रकाशमय

माल कसा मागवावा
या योजनेनुसार ग्राहकाने आपल्याला हव्या असलेल्या मालाची मागणी ९६९९७५४३७० या क्रमांकावर नोंदवावी. फोंड्यासाठी हा क्रमांक असून सदर फोंडा फोंडा ९६९९७५४३७१, वाळपई ९६९९७५४३७२, साखळी ९६९९७५४३७४, डिचोली ९६९९७५४३७५, म्हापसा ९६९९७५४३७६, पर्वरी ९६९९७५४३७८, माशेल ९६९९७५४३७९, वास्को ९६९९७५४३८०, काणकोण ९६९९७५४३८१, कुंकळ्ळी ९६९९७५४३८२, मडगाव ९६९९७५४३८३, आर्लेम ९६९९७५४३८४, शिरोडा ९६९९७५४३८५, कुडचडे ९६९९७५४३८६ असे क्रमांक जाहीर केले आहेत.

ग्राहकाने काय करावे
-सकाळी ८.३० ते दुपारी १,
सायं. ४.३० ते ५.३०वा.पर्यंत माल उपलब्‍ध
-माल वजन व इतर तपशील द्यावा
-किमान दोन हजार रुपयांची खरेदी आवश्‍‍यक
-सेवा शुल्‍क अतिरिक्त साठ रुपये
-भाजीपाला, फळांचा पुरवठा नाही

गर्दी टाळण्‍यासाठी प्रयत्‍न
ग्राहकाला आपल्याला हवा असलेला माल वजन व इतर तपशिलासह नोंद करावा लागेल. किमान एक हजार रुपयांची खरेदी होणे गरजेचे असून सकाळी साडेआठ ते दुपारी एकपर्यंत मालाची नोंदणी करता येईल. संध्यकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत हा माल उपलब्ध केला जाईल. सेवा कर म्हणून अतिरिक्त साठ रुपये भरावे लागतील, असे कळवण्यात आले आहे. भाजी व फळांची मागणी करता येणार नाही.

गोवा बागायतदारमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. कोरोनाचा संभाव्‍य धोका टाळण्यासाठी, तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा धोका दूर करण्यासाठी आणि गणेश चतुर्थी जवळ असल्याने लोकांची गर्दी रोखण्यासाठी अशाप्रकारची ही योजना सुरू केली आहे.
-ॲड. नरेंद्र सावईकर, गोवा बागायतदार अध्यक्ष.

Goa : Ponda: Giving information about the schemes started by Goa Bagayatdar by Adv. Narendra Sawaikar. Along with Nitin Samant and Ulhas Umre.
गोवा सरकारने संमत केलेले भूमिपुत्र विधेयक दूरदृष्टी नसलेले: कोमुनिदाद फोरम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com