Goa: सुर्ला सत्तरीत पट्टेरी वाघाकडून म्हशींचा फडशा!

सुर्ला सत्तरी (Surla Sattari) येथे पट्टेरी वाघाकडून (Tiger) एका म्हशीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.
Tiger
TigerDainik Gomantak

सुर्ला सत्तरी (Surla Sattari) येथे पट्टेरी वाघाकडून (Tiger) एका म्हशीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. येथील नंदरुकीचे मळ या भागात वास्तव्यास असलेल्या देवू झोरे या धनगर कुटुंबाच्या एका म्हशीवर पट्टेरी वाघाने हल्ला करून तिचा फडशा पाडला व तिचे मांस फस्त केले. दोन महिन्यांपूर्वी त्याच कुटुंबातील अशाच आणखी एका म्हशींवर वाघांकडून हल्ला करून तिला जखमी केले होते. त्यामुळे या पट्टेरी वाघामुळे या कुटुंबाला मोठी आर्थिक नुकसान सहन करावी लागत आहे.

दरम्यान ही घटना 17 जून घडली. त्यानंतर म्हादई अभयारण्य (Mhadei Wildlife Sanctuary) क्षेत्राचे वनाधिकारी नारायण प्रभूदेसाई (Narayan Prabhudesai) यांनी आपल्या पथकासमवेत भेट देऊन घटनेचा पंचनामा केला तसेच होंडा पशूवैद्यक ,केंद्राचे पशू वैद्यकानी यांनी मृत म्हशींचा शवविच्छेदन केले. तसेच उपवनपाल(वाल्ड लाईफ) जेबास्टिन अरुलराज व सहाय्यक वनपाल तेजस्विनी ( वाइल्ड लाईफ) (Wildlife) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व झोरे कुटुंबाला त्वरित मदत करण्याचे आश्वासन दिले. या संबंधी उपवनपाल जेबास्टिनअरुलराज यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाईची देण्याची प्रक्रिया सुरू असून ती लवकर दिली जाणार असे सांगितले.

Tiger
Goa : सडयें-शिवोलीत अनियमित पाणीपुरठ्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त

दरम्यान वरील जागा ही म्हादई अभयारण्य क्षेत्रात येत असून सुर्ला गावापासून जवळच आहे. देवू झोरे हे कुटुंब गेल्या अनेक पिढ्या पासून सदर जागेवर राहतात. म्हशी पालन करून दुग्ध व्यवसायावर यांचे कुटुंब चालते. तसेच हा भाग कर्नाटकातील (Karnataka) हुळण राखीव जंगल क्षेत्राला जवळ होते. गेल्या 3-4 महिन्यापासून या भागात पट्टेरी वाघांचा संचार आहे. गोवा वनखात्याने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये तीन वाघ छायांत्रित झाले होते. दरम्यान ही घटना घडल्यानंतर वनखात्यातर्फे या भागात आपली गस्ती वाढवली आहे. या घटनेनंतर 22 जून रोजी या भागात पुन्हा वाघाचा संचय आढळल्याचे वनाधिकारी नारायण प्रभूदेसाई यांनी सांगितले.

Tiger
स्वयंपूर्ण गोवा योजनेला १ जुलैपासून पुन्हा चालना : मुख्यमंत्री

म्हादई अभयारण्य क्षेत्रात पट्टेरी वाघांचा संचार वारंवार दिसून आले आहे. मागील वर्षी याच कुटुंबातील अशाच प्रकारे वाघाच्या हल्ल्यात म्हशींचा फडशा पाडला होता त्यावेळी वनखात्याने त्यांना नुकसान भरपाई दिली होती. पण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात म्हादई अभयारण्य क्षेत्राच्या गोळावली भागात वाघाने म्हशींचा फडशा पाडल्यावर मृत म्हशींवर विष प्रयोग झाला होता व त्यानंतर ते म्हशीचे मांस पुन्हा वाघांनी खाल्यामुळे चार वाघांचा मृत्यू झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com