Goa eggs
Goa eggsDainik Gomantak

Goa Eggs Price: ब्रॉयलर ‘अंड्यां’चा भाव वाढला! शेकड्यावर 100 रुपये चढ, गावठी अंडी 250 रुपये डझन

Goa eggs price hike: श्रावण महिन्यानंतर अंड्यांच्या घाऊक दरात वाढ होताना शंभर अंड्यांमागे किमान १०० रुपयांनी वाढ झाली आहे. पुढील काही दिवस अंड्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
Published on

डिचोली: श्रावण महिना संपून पाच दिवसांची चतुर्थी साजरी झाल्यानंतर ब्रॉयलर अंडी आता महाग झाली आहेत. एकाबाजूने मासळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असताना, दुसऱ्याबाजूने बॉयलर अंड्यांचा भाव मात्र वाढू लागला आहे.

श्रावण महिन्यानंतर अंड्यांच्या घाऊक दरात वाढ होताना शंभर अंड्यांमागे किमान १०० रुपयांनी वाढ झाली आहे. पुढील काही दिवस अंड्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूने गावठी अंडीही महाग झाली आहेत. मासेमारी बंदीनंतर गेल्या श्रावण महिन्याच्या तोंडावर अंड्यांचे भाव काहीसे वाढले होते. मात्र श्रावण महिन्यात ६० ते ७० रुपये डझन असे अंड्यांचे दर होते.

Goa eggs
Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

मासळीची आवक वाढल्यानंतर अंड्यांचे दर कमी होणार, असा अंदाज होता. मात्र अंड्यांचे दर उतरण्याऐवजी ते वाढले आहेत. मासळी पाठोपाठ अंडी महाग होत असल्याने सामान्य खवय्यांना जिभेला लगाम घालावा लागणार आहे.

Goa eggs
Goa Meat Complex: गोवा मांस प्रकल्पाला नवी संजीवनी, महिन्याला 10 कंटेनर विदेशात पाठवणार; खासगी कंपनीशी हातमिळवणी

डिचोली बाजारात बॉयलर अंडी उपलब्ध होत आहेत, त्यात कर्नाटक राज्यातून अंड्यांची अधिक आयात होत असते. बॉयलर अंड्यांच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. अंड्यांच्या घाऊक दरात वाढ होताना शंभर नगामागे ६०० रुपये, असे अंड्यांचे दर झाले आहेत. ७० रुपयांवरून आता ८० रुपये डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. बाजारात क्वचितच गावठी अंडी विक्रीस उपलब्ध होत असून, ती २५० रुपये डझन याप्रमाणे विकण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com