Goa Meat Complex: गोवा मांस प्रकल्पाला नवी संजीवनी, महिन्याला 10 कंटेनर विदेशात पाठवणार; खासगी कंपनीशी हातमिळवणी

Goa Meat Project Usgao: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखानासारखीच गत उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पाची होण्याच्या मार्गावर होती.
usgao goa meat project
usgao goa meat projectDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखानासारखीच गत उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पाची होण्याच्या मार्गावर होती. परंतु सनफेस ॲग्रो फूड्स प्रा. लि.ने वेळीच हात दिल्याने या प्रकल्पाला नवी संजीवनी मिळाली. ही कंपनी म्हशी व रेड्यांचे मांस परदेशात निर्यात करते.

मिळालेल्या माहितीनुसार सरकारने सनफेस ॲग्रो फूड्स प्रा. लि.शी दहा वर्षांचा करार केला असून या कंपनीने आणलेल्या म्हशी व रेड्यांची कत्तल करून ते मांस या कंपनीला पुरवण्याची जबाबदारी गोवा मांस प्रकल्पाकडे सोपवली आहे. दिवसासाठी ३०० म्हशींची कत्तल करण्याची परवानगी या कंपनीला देण्यात आली आहे.

गोवा मीट कॉम्प्लेक्स प्रत्येक म्हशीसाठी ५०० रुपये आकारत आहे. यासाठी केंद्र सरकारच्या एपिडा (ॲग्रिकल्चर प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑफ इंडिया) ची मान्यता गेल्या ऑगस्टमध्ये घेण्यात आली आहे. साल २००३ पासून या प्रकल्पातून मांसाची निर्यात करणे सरकारने काही कारणात्सव बंद केले होते.

२९ जानेवारी रोजी २८.५ टन मांस एका कंटेनरमधून इराकला पाठवण्यात आले. महिन्याला १० कंटेनर पाठवण्याचा कंपनीचे उद्दिष्ट आहे. पुढील काही दिवसांत दुबई, जॉर्डन, ओमान व अन्य देशात मांस निर्यात करण्यात येईल, अशी माहिती सनफेस फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक असीम बी यांनी दिली.

usgao goa meat project
Goa Beef Strike: गोव्यात ख्रिसमसची 'रुचकर' सुरुवात; मांस विक्रीची दुकाने उघडली

म्हशी, रेड्यांची महाराष्ट्र व कर्नाटकातून आयात

गोव्यात म्हशी व रेड्याची संख्या कमी असल्याने या प्रकल्पात महाराष्ट्र व कर्नाटकातून म्हशी व रेडे आयात करण्यात येत आहेत. परंतु रेडे व म्हशीची कायदेशीरपणे आयात करताना काही जणांकडून वाहने रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रकल्पावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच अडथळा दूर होण्याची शक्यता असल्याचे कार्यकारी संचालक आसीम बी.यांनी सांगितले.

usgao goa meat project
Panjim Municipality: मांस व चिकन विक्रेत्यांसाठी सहा आठवड्यांत पर्यायी जागा उपलब्ध करण्याचा आदेश जारी!!

केवळ ३३ कामगार....

२९ जानेवारी रोजी २८.५ टन मांस एक कंटेनर इराक देशात पाठविण्यात आले आहे.

या प्रकल्पात यापूर्वी १०१ कामगार होते, सध्या ३३ कामगार काम करीत असून आणखी अनुभवी कामगारांची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे.

गोवा मांस प्रकल्पामध्ये सनफेस कंपनीतर्फे आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com