Bridge Work | Goa News
Bridge Work | Goa NewsDainik Gomantak

Goa Latest News: शिवडे ते पैकुळ गावाला जोडणारा पूल शोभेची वस्तू!

Goa Latest News: पैकुळवासीयांच्या नशिबी वणवण : रस्ताही खड्डेमय
Published on

Goa Latest News: शिवडे ते पैकुळ गावाला जोडणारा पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु जोडरस्ता तयार करण्यास तेथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधलेला हा पूल सध्या विनावापर आहे. याप्रश्‍नी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने योग्य तोडगा काढून हा पूल सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पैकुळ येथील पूल पावसाळ्यात कोसळल्यानंतर स्थानिक लोकांच्या सोयीसाठी वांडोळा-धारबांदोडा येथील वन खात्याचे गेट खुले करण्यात आले आहे. पूर्वी हा रस्ता बोंडला प्राणी संग्रहालयात जाण्यासाठी वापरला जायचा.

आता लोकांसाठी हा रस्ता खुला करण्यात आला असला तरी खड्डेमय रस्त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. पैकुळ गावातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने शिवडे येथील पुलाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

पैकुळसाठी वरदान ठरलेला पूल पावसाळ्यात कोसळला. त्यामुळे वाहने घेऊन गुळेली गावाकडे जाणे कठीण झाले होते. वन खात्याने स्थानिक लोकांची गैरसोय लक्षात घेऊन वांडोळा येथील बंद ठेवलेला बोंडला येथे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

Bridge Work | Goa News
Shekhar Rankhambe IFFI 2022: ‘रेखा’द्वारे दुर्लक्षित घटकाला आणले पडद्यावर

दुचाकीस्वारांची तारेवरची कसरत :

गेल्या 3-4 महिन्यांपासून येथील लोक वांडोळा मार्गे धारबांदोड्याला जातात. मात्र, हा रस्ता खड्डेमय असल्याने वाहनचालकांची खासकरून दुचाकीचालकांची गोची होते. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वांडोळा येथील वन खात्याचा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. वन खात्यातर्फे सध्या एक कर्मचारी गेटजवळ तैनात केला आहे.

"वांडोळा येथील वन खात्याचा रस्ता तात्पुरता पैकुळ भागातील लोकांसाठी खुला ठेवला आहे. पैकुळ येथे नवीन पूल बांधल्यानंतर वांडोळा येथील वन खात्याचा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. लोकांची गैरसोय लक्षात घेऊनच याबाबत निर्णय घेतला आहे."

- नारायण प्रभुदेसाई, वन अधिकारी, कुळे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com