Shekhar Rankhambe IFFI 2022: ‘रेखा’द्वारे दुर्लक्षित घटकाला आणले पडद्यावर

Shekhar Rankhambe IFFI 2022: समाजाच्या मलीन वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा चित्रपट
Shekhar Rankhambe |Goa News
Shekhar Rankhambe |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Latest Update IFFI 2022: रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना बघून इतर लोक त्यांच्यापासून दूर जातात. गाड्यांचे दरवाजे बंद करतात. अशा दुर्लक्षित समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे या विचारावर आपण दोन वर्षे संशोधन केले आणि त्यातून जी माहिती मिळाली ती ‘रेखा’ या लघुपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणली.

समाजाने रस्त्यावर राहणाऱ्यांबाबत दृष्टिकोन बदलण्याची गरज हा चित्रपट व्यक्त करतो, अशी माहिती रेखा या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी दिली. 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्र सूचना कार्यालयाने ‘इफ्फी टेबल टॉक’अंतर्गत प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांसोबत आयोजित केलेल्या चर्चेत ते बोलत होते.

रणखांबे म्हणाले, की खूप संशोधनानंतर या चित्रपटासाठीची स्क्रिप्ट तयार केली. त्यानंतर या चित्रपटात भूमिका करण्यासाठी तशाच राहणीमानातील लोकांचा शोध घेतला, परंतु समाजाच्या दुर्लक्षितपणाची आणि पिचलेल्या, गंजलेल्या माणसाच्या डोळ्यांत जो समस्यांचा डोंगर दिसायला हवा होता.

तशा डोळ्यांच्या व्यक्ती सापडत नव्हत्या. शेवटी गरिबीने गंजलेल्या, अस्वच्छ वातावरणात राहणाऱ्या आणि तमाशात काम करणाऱ्या माया पवार आणि तमिना पवार या दोन मुलींच्या डोळ्यात मला ते दुःख दिसले.

त्यांना त्या भूमिका करण्यासाठी तयार केले, परंतु साधारण दोन महिने त्यांचा सराव आणि संवाद पाठांतरासाठी मेहनत घ्यावी लागली. प्रख्यात मराठी दिग्दर्शक रवी जाधव, मेघना जाधव यांच्या मदतीने चित्रीकरण केले.

‘रेखा’ हा चित्रपट रस्त्यावर राहणाऱ्यांच्या अस्वच्छतेच्या समस्येवर प्रकाश टाकतो आणि त्यांच्याप्रती असलेल्या समाजाच्या मलिन वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. रस्त्यावर राहणाऱ्या महिलांच्या जीवनातील अडचणी मांडतानाच हा चित्रपट त्यांच्या मासिक पाळी व आरोग्याच्या वाईट स्थितीकडेही लक्ष वेधतो.

या चित्रपटातील नायिका रेखा ही रस्त्याकडेला जीवन व्यथित करणारी असते. कधीच अंघोळ न केल्याने बुरशीजन्य संसर्ग होतो. तिचा नवरा आणि त्यांच्या समाजातील ज्येष्ठ मंडळी तिला अंघोळ करण्यास मनाई करतात. कारण तिने अंघोळ केली, ती सुंदर दिसली, तर तिच्यावर कोणाची तरी नजर पडेल याची भीती त्या समाजाला असते.

स्वच्छ राहण्यासाठी तिने केलेल्या संघर्षाचे चित्रण या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियान आम्ही राबवतो आणि दुसरीकडे अस्वच्छतेचे हे विदारक चित्र असते, असे रणखांबे यांनी सांगितले.

Shekhar Rankhambe |Goa News
Priyanandan IFFI 2022: आदिवासी कलाकारांनीच साकारला ‘धाबरी कुरुवी’

‘लई भारी वाटलं...’

रस्त्यावर राहणारी, तमाशात मिळेल ते काम करून पोट भरणारी पारधी समाजाची आमची जात, परंतु शेखर रणखांबे यांनी आम्हाला रस्त्यावरून उचलून पडद्यावर आणले हे आम्हाला लई भारी वाटलं, अशी प्रतिक्रिया ‘रेखा’ चित्रपटाची नायिका माया पवार आणि सहनायिका तमिना पवार यांनी व्यक्त केली.

आमच्याकडे दुर्लक्ष करणारा समाज आम्ही चित्रपटात काम केल्यावर आता आम्हाला भेटू लागला आहे, आमच्याशी बोलू लागला आहे. हे पाहून आम्हाला बरे वाटू लागले आहे. ‘स्त्री’ मग ती उच्चभ्रू समाजातील असू दे किंवा रस्त्यावर राहणारी, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखाच असायला हवा हेच या सिनेमातून दाखवून देण्याचा शेखर रणखांबे यांचा हेतू होता, तो आम्ही आमच्या अभिनयातून साध्य करण्याचा प्रयत्न केला, असे तमिना पवार हिने आत्मविश्वासाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com