Goa News: गोमन्तक टीव्हीच्या वृत्ताची दखल, समिक्षा नाईकांना पत्रे सुपूर्द; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Marathi Breaking News Today: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी
Goa Marathi News
Goa Marathi NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोमन्तक टीव्हीच्या वृत्ताची दखल, समिक्षा नाईकांना पत्रे सुपूर्द

वाजे शिरोडा येथील समिक्षा नाईक ह्या वृद्ध महिलेच्या घराच्या छप्पर दुरुस्तीसाठी मगोचे युवा नेते संकेत मुळे यांच्याकडून १० पत्रे सुपूर्द. याआधी शिवप्रसाद शिरोडकरांकडून नाईक यांच्या घराची पहाणी करुन घर दुरुस्तीचे आश्वासन. गोमन्तक टीव्हीने प्रसारीत केलेल्या वृत्ताची अनेकांकडून दखल.

अवर लेडी ऑफ लॉर्डेस चर्चला फिलिप नेरी कार्डिनल फेराओ यांची भेट

वाळपई येथील अवर लेडी ऑफ लॉर्डेस चर्चला फिलिप नेरी कार्डिनल फेराओ यांनी अचानक भेट दिली. पॅरिश पुजारी फादर विन्स्टन बारबोझा एमएसएफएस आणि फादर रॉबर्ट फर्नांडिस यांनी फादर अ‍ॅग्नेलो लॉरेन्को यांच्यासह त्यांचे हार्दिक स्वागत केले. या भेटीमुळे पॅरिश समुदायाला, विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.

धक्कादायक ! आगरवाडा पेडणेत मुलाकडून आईवर कोयत्याचे वार

आगरवाडा,पेडणे मुलगा चंद्रशेखर उर्फ संजू पाटील याने आपल्या स्वतःच्या आईवर केले कोयत्याचे वार. गंभीर जखमी आईवर जीएमसीत उपचार सुरू. मुलाला मांद्रे पोलिसांनी केली अटक. अंतर्गत वादावादीतून हे भयंकर कृत्य घडल्याची पोलिसांची माहिती.

बोरी पुलावरील खड्ड्यातील सळी पंक्चर होण्याची भीती

बोरी पुलावरील खड्ड्यातील सळीमुळे वाहनाचे टायर पंक्चर होण्याची भीती.

रस्ता खोदण्यास मनाई असताना देखील मांद्रे दांडोसवाडा येथे खोदकाम चालू

रस्ता खोदण्यास मनाई असताना देखील मांद्रे दांडोसवाडा येथे उपसरपंच संपदा आजगावकर यांच्या प्रभागात रस्त्यावर खोदकाम चालू. १५ मेपासून रस्ता खोदण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने मनाई केली होती.

'हर घर टॉयलेट'वरुन‌ मुख्यमंत्र्यांचे विरेशला टोमणे; Watch Video

गोमन्तक टीव्हीच्या वृत्ताची सामाजीक व राजकीय नेत्यांकडून दखल, समिक्षा नाईकांच्या मदतीसाठी सरसावले हात

वाजे शिरोडा येथील समिक्षा नाईक ह्या वृद्ध महिलेच्या घराच्या दुरावस्थेवर गोमन्तक टीव्हीने प्रसारीत केलेल्या वृत्ताची सामाजीक आणि राजकीय नेत्यांनी घेतली दखल. वृत्त प्रसारीत झाल्यानंतर अनेकांकडून मदतीचा ओघ सुरू. समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकरांनी भेट देत घराच्या दुरुस्तीचे दिले आश्वासन.

मशरूम फॅक्टरीमध्ये जाणारा ट्रेलर रस्त्यावर कोसळला

उसगाव येथे रविवारी रात्री मशरूम फॅक्टरीमध्ये जाणारा ट्रेलर रस्त्यावर कोसळला. उजवीकडे वळण घेत ट्रेलर कोसळला. रात्रीची वेळ असल्याने जवळ असलेल्या हॉटेल बंद होते. दिवस भरात त्याठिकाणी वाहने पार्क करून अनेक जण हॉटेल मध्ये जातात. सकाळी ट्रेलर काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र उसगाव - वाळपई मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

धारबांदोड्यात आढळला महिलेचा मृतदेह; खूनाचा संशय

प्रतापनगर-धारबांदोडा परिसरात सापडलेल्या महिलेचा मृतदेह अंदाजे २० ते ३० वयोगटातील असून, प्राथमिक तपासाच्या माहितीनुसार खूनाची शक्यता. अधिक तपास सुरू.

"दावेदारांना मदत करण्यासाठी वन हक्क शिबिरे आयोजित" डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दावेदारांना मदत करण्यासाठी आणि वन हक्क कायदा २००६ च्या दाव्यांचा निपटारा जलद करण्यासाठी गोव्यात सत्तरी, फोंडा, धारबांदोडा, सांगे, काणकोण आणि केपे येथे वन हक्क शिबिरे आयोजित करण्यात आली. न्याय मिळवण्यासाठी एक पाऊल म्हणून १,६३५ दावेदारांनी यात सहभाग घेतला: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com