
"सरकारचीच खातीच वीज बिलांचे थकीत. गोमेकॉचे २.८९ कोटींचे बील थकी, वीज खातेच स्वतःचे ७४.८र कोटींचे थकीत. थकीत बिलाच्या रकमेच्या आकडेवारीत गणिती चुका." अमित पाटकर.
पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी पती मैनुद्दीन हवांगीला दहा दिवसांची पोलिस कोठडी. शुक्रवारी वाठादेव-डिचोली येथे नवऱ्याकडून पत्नीचा खून करण्याची घटना
डिचोली पोलिसांनी साखळी येथील कुडणे येथील रहिवासी मिलेश गुरव याच्याविरुद्ध गोकुळवाडी, साखळी येथील रहिवाशांना धमकावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे, ज्यामुळे काही जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरव हा सध्या वाळपई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे.
आम्ही POGO बाबत कधीही तडजोड करणार नाही. आर्थिक विकास, शिक्षण आणि औद्योगिकीकरणाच्या बाबतीत गोवा इतर राज्यांपेक्षा मागे आहे. म्हणूनच गोव्यातील मूळ व्यक्ती (POGO) आवश्यक आहे. एक दिवस विधानसभेत POGO विधेयक मंजूर होईल : मनोज परब
गोव्याचे नवे राज्यपाल पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो. ते राज्याच्या कारभारात आणि प्रशासनात आपले मार्गदर्शन करतील: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
"गोव्यात येऊन मला आनंद झाला आहे, मला स्थानिक भाषा येत नाही. पण सर्वांसोबत काम करण्यास उत्सुक आहे"; गोव्याचे नवे राज्यपाल पी. अशोक गजपती राजू.
आयएमडी गोव्याने २९ जुलै २०२५ पर्यंत राज्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज.
पुसपती अशोक गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
गेल्या २४ तासांत, वाळपई येथे सर्वाधिक १०५.५ मिमी पाऊस पडला, तर पणजी येथे सर्वात कमी २२.८ मिमी पाऊस पडला.
"भारतीय सैनिकांची आठवण सदैव आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे" नगराधक्ष प्रसन्ना गावस. गोयकर निवृत्त सैनिक संघ तर्फे वाळपई शहीद स्तंभ येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा.
फोंडा येथील क्रांती मैदानावर कारगिल विजय दिवस साजरा. नगराध्यक्ष आनंद नाईक, कर्नल नीरज नौटीयाल, पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर व अन्य मान्यवर उपस्थित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.