Gramsabha: अडवलपालमध्ये खाणीला विरोध तर रिवणवासीयांचे ‘आयआयटी’ला समर्थन; राज्यभरातल्या ग्रामसभा तापल्या

नागरी प्रश्‍‍नांना फुटली वाचा, पंचायत मंडळे धारेवर
Gramsabha News
Gramsabha NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Gramsabha News: राज्यात अनेक ठिकाणी आज झालेल्या ग्रामसभा विविध प्रश्नांनी तापल्या. ग्रामस्थांनी नागरी समस्यांवरून सत्ताधारी पंचायत मंडळ व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

खाण व्यवस्थापनाकडून स्थानिकांविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घ्या, अशी मागणी करत अडवलपाल ग्रामसभेत ग्रामस्थांनी गाव उद्‍ध्वस्त करणारा खाण व्यवसाय आम्हाला नको, अशी भूमिका घेतली, तर रिवणवासीयांनी ‘आयआयटी’ला समर्थन दिले.

ग्रामसभांमध्‍ये नागरी समस्‍यांना वाचा फुटली. तांबडीसुर्ला ग्रामसभेत भगवान महावीर अभयारण्यातील अवैध बांधकाम हटविण्याची मागणी केली. लोटली ग्रामसभेत नव्या बोरी पुलाला विरोध करण्यात आला. शितोळ तळ्याच्या बांधकामाला वेरे-वाघुर्मेतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला.

ग्रामस्थ म्हणतात...

1. पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन खाण व्यवस्थापनाकडून अडवलपालच्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घ्यावेत. स्थानिक आमदार आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ग्रामस्थांचे प्रश्न सोडवावेत.

2. खाण व्यवसाय कार्य क्षेत्राविषयी माहिती उपलब्ध करून द्यावी व नंतरच खाण ब्लॉक-५ अंतर्गत खाण सुरू करण्यास ‘ना हरकत दाखला’ द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली व तसा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला.

3. खाण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जनसुनावणी अडवलपाल गावातच व्हावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी गाव उद्‍ध्वस्त करणारा खाण व्यवसाय आम्हाला नकोच अशी भूमिका मांडली.

बोरी पुलाला विरोध

लोटली येथील ग्रामसभेत नवीन बोरी पुलाला विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी ग्रामस्थांनी दुचाकीची रॅली काढली व जागृती केली. नवीन बोरी पूल खाजन शेत जमिनीतून जात आहे. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे, असे स्थानिकांचे मत आहे.

‘आयआयटी’चा मार्ग प्रशस्‍त

आयआयटीच्या समर्थनार्थ रिवण ग्रामपंचायतीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांची सभेला उपस्थिती होती.

त्यांनी 100 टक्के नागरिकांनी आयआयटीसाठी संमती दर्शवल्याचे नमूद केले. रिवण पंचायतीच्या ग्रामसभेत या प्रकल्पाला लोकांचा हिरवा कंदील मिळाल्याने एकप्रकारे प्रश्‍‍न सुटल्‍यात जमा आहे.

Gramsabha News
Mapusa Fire Case: करासवाडा येथे घराला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे आग भडकल्याची स्थानिकांची माहिती

शितोळ तळ्याला विरोध:

वेरे-वाघुर्मे पंचायत क्षेत्रातील भूतखांब पठाराजवळील शितोळ तळ्याच्या बांधकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या तळ्याचे बांधकामच रद्द ठरवण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.

शितोळ तळ्याच्या एकाच विषयावर ही ग्रामसभा तीन तास चालली व सुरू असलेले बांधकाम रद्द करून आहे त्या स्थितीत या तळ्याचे काम पूर्ववत स्थितीत आणण्यासंबंधीचा ठराव संमत झाला.

Gramsabha News
केंद्राचे कर्नाटकवर प्रेम नाही का? म्हादईच्या पाण्यावरुन CM सिद्धरामय्या आणि MP तेजस्वी सूर्या यांच्यात जुंपली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com