गोव्यातील ब्रेन डेड व्यक्तीच्या Liver मुळे इंदूरच्या वृद्धाला मिळाले नवजीवन; दोघांना किडनी दान

Goa News: रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना २९ जानेवारीला ब्रेन डेड घोषित केले.
गोव्यातील ब्रेन डेड व्यक्तीच्या Liver मुळे इंदूरच्या वृद्धाला मिळाले नवजीवन; दोघांना किडनी दान
Goa GMCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या माध्यमातून एका व्यक्तीला नवजीवन मिळाले आहे. गोव्याहून इंदूरला विमानाने आणलेले यकृत ६७ वर्षीय व्यक्तीच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आले. याशिवाय हेल्थवे रुग्णालयातील ३४ वर्षीय रुग्ण आणि गोमेकॉतील ४२ वर्षीय महिलेला प्रत्येकी एक मुत्रपिंड दान करण्यात आले.

मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय अजय गिरी यांना २६ जानेवारी रोजी ब्रेन हॅमरेजमुळे गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना २९ जानेवारीला ब्रेन डेड घोषित केले.

गोव्यातील ब्रेन डेड व्यक्तीच्या Liver मुळे इंदूरच्या वृद्धाला मिळाले नवजीवन; दोघांना किडनी दान
Mumbai-Goa Highway: कोट्यवधींचा खर्च, अपघाती मृत्यूची संख्या वाढली! जबाबदार कोण? नव्या डेडलाईनवरुन शरद पवारांच्या NCP चा सवाल

गिरी यांच्या कुटुंबाने त्यांचे अवयव दान करण्यास सहमती दर्शवली, त्यानंतर शल्यचिकित्सकांनी त्यांच्या ब्रेन डेड बॉडीमधून यकृत काढले. अजयचे यकृत गोव्याहून मध्य प्रदेशातील इंदूरला गुरुवारी सायंकाळी खासगी विमान कंपनीच्या विमानाने पाठवण्यात आले.

यकृत रक्त फिल्टर करते, पोषक घटकांचे चयापचय करते आणि अन्न पचवण्यास मदत करते.

इंदूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ६७ वर्षीय रुग्णाच्या शरीरात नंतर हे यकृत प्रत्यारोपित करण्यात आले. 'यकृत प्रत्यारोपणाच्या ऑपरेशननंतर रुग्णाची प्रकृती बरी आहे. गिरी यांच्या मरणोत्तर अवयवदानामुळे त्यांना नवजीवन मिळाले, अशी माहिती इंदूर सोसायटी फॉर ऑर्गन डोनेशनचे संस्थापक-सचिव डॉ संजय दीक्षित यांनी पीटीआयला दिली.

गोव्यातील ब्रेन डेड व्यक्तीच्या Liver मुळे इंदूरच्या वृद्धाला मिळाले नवजीवन; दोघांना किडनी दान
Morjim Beach: पर्यटकांना स्टंटबाजी भोवली! बीचवर घेऊन गेले कार; दोघांवर गुन्हा, कार जप्त

याशिवाय अजयाच्या अवयवांमुळे आणखी दोघांना जीवदान मिळाले आहे. हेल्थवे रुग्णालयातील ३४ वर्षीय रुग्ण आणि गोमेकॉतील ४२ वर्षीय महिलेला प्रत्येकी एक मुत्रपिंड दान करण्यात आल्याने त्यांना नवसंजीवनी मिळालीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com