12th Supplementary Exam: 'नीट'मुळे बारावीची पुरवणी परीक्षा 10 दिवस लांबणीवर, गोवा बोर्डाचा निर्णय; विद्यार्थ्यांमध्‍ये समाधान

Goa 12th Supplementary Exam: वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्‍या ‘नीट’ परीक्षेमुळे बारावीची पुरवणी परीक्षा गोवा बोर्डाने दहा दिवसांनी पुढे ढकलली आहे.
12th Supplementary Exam
12th Supplementary ExamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्‍या ‘नीट’ परीक्षेमुळे बारावीची पुरवणी परीक्षा गोवा बोर्डाने दहा दिवसांनी पुढे ढकलली आहे. ही परीक्षा याआधी २७ एप्रिलपासून सुरू होणार होती. परंतु, ती आता ६ मेपासून घेण्‍याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले तसेच काही विषयांत कमी गुण मिळालेले विद्यार्थी पुरवणी परीक्षा देत असतात. दरवर्षी

हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. यंदा ‘नीट’ आणि पुरवणी या दोन्‍ही परीक्षा एकाचवेळी आल्‍याने गोवा बोर्डाने पुरवणी परीक्षा दहा दिवस पुढे ढकलली असून, आता ही परीक्षा ६ ते १६ मे या कालावधीत घेतली जाणार आहे.

12th Supplementary Exam
Goa Unseasonal Rain: वाळपईला अवकाळी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा, झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड; घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

परीक्षेसाठी म्‍हापसा आणि मडगाव अशी दोन केंद्रे ठेवण्‍यात आली असून, सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत परीक्षा घेण्‍यात येणार असल्‍याचे बोर्डाचे अध्‍यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.

12th Supplementary Exam
Goa 11th Admission: अकरावीसाठी आजपासून प्रवेश, शिक्षण विभाग सज्ज; वाणिज्य, विज्ञान शाखेत चुरस अपेक्षित

दोन्‍ही परीक्षा होत्‍या एकाच वेळी

‘नीट’साठी इच्‍छुक अनेक विद्यार्थी बारावीच्‍या पुरवणी परीक्षेचीही तयारी करत असतात. दोन्‍ही परीक्षा एकाचवेळी असल्‍याने अनेकांवर मानसिक दडपण आले होते. परंतु, गोवा बोर्डाच्‍या निर्णयामुळे त्‍या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षा दिल्‍यानंतर पुरवणी परीक्षेच्‍या अभ्‍यासासाठी आणखी वेळ मिळणार आहे. त्‍यामुळे त्‍यांनी समाधान व्‍यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com