गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींचीच बाजी

Goa Board 12th Result Declared : गोवा बोर्डाने इयत्ता 12वीचा 92.66% निकाल नोंदवला आहे.
Goa Board 12th Result Declared
Goa Board 12th Result DeclaredDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 92.66 टक्के लागल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली. यंदाही बारावीच्या परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली असून 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.66 टक्के आहे.

Goa Board 12th Result Declared
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 व्हडल्यो मुखेल खबरो (21st May 2022)

शिक्षण मंडळाने यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांत 18 केंद्र आणि 72 उपकेंद्रांवर घेतली होती. यासाठी राज्यभरातून 18 हजार 201 विद्यार्थी बसले होते. यापैकी कला शाखेमध्ये 4 हजार 754, वाणिज्य शाखेत 5 हजार 496, विज्ञान शाखेत 5 हजार 77 तर व्यावसायिक शाखेमध्ये 2 हजार 874 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

मागील वर्षी सर्वाधिक निकाल

मागील वर्षी कोरोनाच्या कारणास्तव परीक्षा घेतल्या नव्हत्या. मुलांच्या मागील परफॉर्मर बेस निकाल दिला होता, तो 99.40 टक्के निकाल लागला होता.

दोन सत्रांत परीक्षा

यंदा नेहमीप्रमाणे नियमित परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, प्रथमच त्या दोन सत्रांत घेण्यात आल्या. प्रत्येक सत्राला 50 टक्के गुण देण्यात आले. याशिवाय अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 टक्के गुण देण्यात आले. त्यावरून हा निकाल देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com