Goa News : कमळ फुलवा; तेच माझ्यासाठी ‘बर्थडे गिफ्ट : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa News : गोमंतकीयांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर व दक्षिण गोव्यातील उमेदवार मताधिक्याने निवडून द्यावे, ही आपली त्याना विनंती असून तीच गोमंतकीयांनी आपल्याला वाढदिनी दिलेली मोठी भेट समजेन, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

सासष्टी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आपला ५१वा वाढदिवस साजरा केला. दोन्ही मतदाररसंघात भाजपला निवडून द्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची आपल्याकडून भेट असेल,असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी नेते, कार्यकर्ते, हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर साजरा होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला चांगलेच महत्व प्राप्त झाले.

आज सकाळी साखळी मंदिरात जाऊन त्यांनी अभिषेक केला व आपल्या घरी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. नंतर ते मडगावात दक्षिण गोवा भाजप जिल्हा कार्यालयात आले व तेथे असंख्य कार्यकर्ते, नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Goa
Goa News: कला अकादमीवरुन वादंग, IPL सट्टा यासह राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

मडगावचे आमदार दिगंबर कामत, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, नावेलीचे आमदार उल्हास तुयेंकर, माजी आमदार दामोदर नाईक, महिला आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा प्रभू तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य, हाज समितीचे चेअरमन उर्फान मुल्ला व अनेक कार्यकर्ते व हितचिंतकांचा त्यात समावेश होता. शुभेच्छा दिलेल्या, सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

भाजप उमेदवारांना मताधिक्य द्या!

गोमंतकीयांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर व दक्षिण गोव्यातील उमेदवार मताधिक्याने निवडून द्यावे, ही आपली त्याना विनंती असून तीच गोमंतकीयांनी आपल्याला वाढदिनी दिलेली मोठी भेट समजेन, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

त्यानंतर त्यांनी पणजीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात व नंतर म्हापसा येथील भाजपच्या उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात उपस्थित राहून कार्यकर्ते व नेत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com