Goa: संघटनात्‍मक कार्यामुळे सांगेत भाजपला यश

Goa: कार्यकर्त्‍यांची मजबूत संघटनात्‍मक बांधणी; अनेक जण सहभागास इच्‍छुक
Goa: BJP Logo
Goa: BJP LogoTwitter/@BJP

सांगे : सांगे (Sanguem Goa) मतदारसंघ हा संघटनेच्या आधारावर जिंकणारा मतदारसंघ होय. संघसंस्कार आणि प्रेरणा घेऊन १९८९ साली सांगे मतदारसंघात भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून मनोदय फडते यांनी, अजय कुर्डीकर, प्रसाद तिळवे, सुरेश नाईक, प्रसाद ताणशीकर यांना सोबत घेऊन युवा मोर्चाच्या रूपाने भाजपचे (Goa BJP) काम सुरू केले. त्यात माजी आमदार स्व. प्रभाकर गावकर यांचा समावेश होता. तो काळ गोव्यात पुलोआ सरकार आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचे सरकार अशा परिस्थितीत मूठभर कार्यकर्त्यांनी मजबूत संघटनात्मक बांधणी केली. त्या जोरावर तब्बल दहा वर्षांत सांगेत भाजपला प्रथम यश मिळाले. सलग चार वेळा सांगे मतदारसंघात भाजपने जय मिळविला. संघटन मंत्री सतीश धोंड यांच्या तालमीत तयार झालेले अनेक कार्यकर्ते सांगेत आहेत. त्यांच्या जोरावर पक्ष अधिक मजबूत झाला. मात्र, आज काही कारणामुळे ते कार्यकर्ते लांब राहिले आहेत.

Goa: BJP Logo
'प्रदुषण कमी करणार' पेपर मील कंपनीचे होंडा पंचायत मंडळाला आश्वासन

आज सांगेतील पक्षाची धुरा माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. नवनाथ नाईक हे मंडळ अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. क्षेत्रफळ मोठे असल्याने कार्यकर्त्यांची फळी मोठी असायला हवी. आज ४६ मतदान केंद्रे बनली आहेत. त्‍यापैकी निम्म्याहून अधिक केंद्रांवर अजूनही थेट संपर्क साधण्यासाठी कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही. पूर्वी दळणवळणाच्‍या सुविधा उपलब्ध नसताना संघटनात्‍मक बांधणी करून भाजपने आपला गड मजबूत केला होता. पूर्वी वाहने सोडाच, रस्तेही नव्हते. अशा कठीण परिस्थितीत विरोधक म्हणून संघटनात्‍मक कार्य करणे फार कठीण होते. आज त्या मानाने सुधारणा झाल्या आहेत. आता भाजपच्‍या संघटन कामासाठी अनेकजण स्वतःहून येतात. कारण सत्ता असल्याने अनेक फायदे असतात. पण काँग्रेस सरकारच्‍या विरोधात काम करणे किती कठीण होते ते आजही त्या काळातील भाजप कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्या काळात पक्षकार्य करताना अनेकांनी मानहानी पत्करून, पोलिसांचा लाठीमार, घरच्या मंडळींकडून अपमान सहन करून, सत्ताधाऱ्यांकडून प्रसंगी मारहाणही सहन करून या कार्यकर्त्यांनी भाजपची बांधणी केली.

विविध समित्‍यांची बांधणी

याच पक्ष बांधणीच्या जोरावर स्व. प्रभाकर गावकर हे भाजपचे पहिले आमदार बनले. त्या नंतर दोन वेळा वासुदेव मेंग गावकर, सुभाष फळदेसाई हे एकदा आमदार झाले. आज संपूर्ण पक्ष बांधणी करण्यासाठी माजी आमदार सुभाष फळदेसाई, मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक, सरचिटणीस राजेश गावकर, सुदेश भंडारी, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर आदी कार्यकर्ते संघटना बळकट करण्यासाठी कार्यरत आहेत. कार्यकर्ते जमविण्यासाठी मंडळ समिती, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, बूथ समिती, शक्तीकेंद्र प्रमुख अशा प्रकारे विविध मोर्चांच्‍या समिती तयार करताना प्रत्येकी ३१ कार्यकर्ते हाताशी धरून संघटनेची बांधणी केली जात आहे. पक्षाने दिलेले कार्यक्रम, उपक्रम राबविताना कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्ष मजबूत करण्यासाठी भर दिला जात आहे.

मंडळ समिती किंवा अन्य समित्यांची महिन्यातून एकदा किंवा दीड-दोन महिन्यात बैठका घेऊन भाजप कार्यकर्त्यांना सक्रिय केले जात असते. अधून मधून प्रदेश ठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणे व अशा अनेक कार्यक्रमांतून पक्षाचे कार्य पुढे जात असते. या सर्व घडामोडींवर पक्षाचे बारीक लक्ष असते. अधून मधून पक्षाचे नेते सांगे भागात दौरा करून मार्गदर्शन करीत असतात. या सर्व घडामोडींतून पक्षाचा सर्व आघाड्यांवर विस्तार होत आहे.

- सुरेश केपेकर, जिल्हा पंचायत सदस्य

Goa: BJP Logo
Goa: लाखेरे येथील भीषण अपघातात,डिचोलीतील व्यापारी ठार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com