Goa: one dead in road accident in Lakheri
Goa: one dead in road accident in Lakheri Dainik Gomantak

Goa: लाखेरे येथील भीषण अपघातात,डिचोलीतील व्यापारी ठार

हा अपघात रविवारी सायंकाळी उशिरा लाखेरे येथील जंक्शनवर घडला.
Published on

डिचोली: सर्वत्र अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह संचारला असतानाच, लाखेरे-डिचोली येथे झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार झालाआहे . हा अपघात रविवारी सायंकाळी उशिरा लाखेरे येथील जंक्शनवर घडला.अपघातात ठार झालेल्या मयत व्यक्तीचे नाव कृष्णा सावंत (वय-65) असे असून, ते किराणा व्यापारी होते. त्यांचे डिचोली बाजारात किराणा दुकान आहे. अपघातात ठार झालेले कृष्णा हे मूळ महाराष्ट्रातील दोडामार्ग भागातील होते. (Goa: one dead in road accident in Lakheri)

Goa: one dead in road accident in Lakheri
Goa: ओशेल पंचायतीच्या उपसरपंचपदी प्रवीण कोचरेकर

यासंबंधी मिळालेली माहिती अशी की, कृष्णा सावंत हे आपल्या स्कुटरवरुन लाखेरे येथील राहत्या घराकडून डिचोली शहाराच्या दिशेने जात होते. मुख्य रस्त्याला जोडलेल्या जंक्शनवर ते पोचले असतानाच, डिचोलीहून येणाऱ्या मोटारगाडीची कृष्णा यांच्या दुचाकीला धडक बसली. त्याबरोबर दुचाकीसह कृष्णा रस्त्यावर फेकले गेले. दुचाकीला ठोकरल्यानंतर मोटारीची धडक समोरून येणाऱ्या जीए-04-ई-0958 या क्रमांकाच्या अन्य मोटारगाडीला बसली . अपघातानंतर लागलीच कृष्णा यांना सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर महाराष्ट्रातील मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघात प्रकरणी डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com