Goa: शिक्षकांना सक्षमपणे कार्यरत ठेवण्यासाठी भाजपचा स्वतंत्र विभाग

सदानंद शेट तानावडे : (Sadanand Shet Tanavade) समस्या सोडवण्यासाठी होणार साहाय्य
Goa Bjp Teacher Sale
Goa Bjp Teacher SaleDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : भाजपने (Goa Bjp) शिक्षक विभाग स्थापन केला आहे. (Teachers Sale) या विभागाच्या समन्वयकपदी बाबाजी सावंत (babaJi Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वतीने नवीन विविध विभाग स्थापन करण्यात येत आहेत. गरज आणि मागणीनुसार सध्या कार्यरत असलेल्या विविध मोर्चा आणि विभागांसह नवीन विभागही कार्यरत करण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिकपासून (Primary Education) उच्च शिक्षणापर्यंत (Higher Education) विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा परिणाम अर्थातच शिक्षकांच्या कामावर होत आहे. तसेच यादरम्यान शिक्षकांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी तसेच शिक्षकांना सक्षमपणे कार्यरत ठेवण्यासाठी भाजपने शिक्षक विभाग सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

Goa Bjp Teacher Sale
Goa: समाधानकारक भरपाई द्या; 10 हजारांची भीक नको: फ्रान्सिस द तुयेंची मागणी

या विभागाच्या सदस्यपदी सागर वेळीप, (Sagar Velip) लेखराज नाईक, रूपेश गावस, (Rupesh Gavas) वसंत सैल, अनुप नाईक, (Anup Naik) समीर नाईक, सुदेश गावकर, कपिल भंडारी, श्रीनिवास पाटील, नीलेश नाईक, रजनीकांत सावंत, निकिता नाईक आदींची निवड करण्यात आली असल्याचे तानावडे यांनी सांगितले. यावेळी नवीन विभागाच्या सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक (Damodar Naik) यांनी स्वागत आणि आभार मानले.

Goa Bjp Teacher Sale
Goa: समुद्राच्या तटावर बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरुन शिवोलीत 'राजकारण'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com