Sadanand  Tanavade
Sadanand TanavadeDainik Gomantak

Sadanand Tanavade: दुहेरी नागरिकत्वाला भाजपचा विरोधच

Sadanand Tanavade: : ब्रिटीशकालीन कायदे बदलून पारदर्शकता आणणार
Published on

Sadanand Tanavade: दुहेरी नागरिकत्वाला भाजपचा विरोध आहे. मात्र, गोव्यातील ज्या लोकांनी पोर्तुगीज नागरिकत्वासाठी नोंदणी केली आहे, ती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द केले जात आहे.

त्यामुळे जोपर्यंत पोर्तुगीज नागरिकत्व मिळत नाही, तोपर्यंत भारतीय नागरिकत्व रद्द केले जाऊ नये, अशी मागणी राज्यसभेत केली आहे.

ब्रिटीशकालीन कायदे बदलून पारदर्शकता व जलदगतीने न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

Sadanand  Tanavade
Nitin Gadkari: निर्यातभिमुख धोरण स्वीकारल्याने रोजगाराच्या अनेक संधी - गडकरी

गेले १४ दिवस चाललेल्या लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजात गोव्यातर्फे मांडलेल्या विधेयकांवर मत मांडण्याची संधी मिळाली. यावेळी १३ विधेयके मांडून ती मंजूर केली. गोव्यासंदर्भात विविध खात्यांचे ३१ प्रश्‍न मांडले.

त्यात वास्को ते कुळे रेल्वे प्राधान्याने सुरू करण्याची मागणी विशेष सूचनेद्वारे केली. पोर्तुगीज पासपोर्टसंदर्भात प्रश्‍न मांडला. वास्को ते बेळगाव आणि परत अशी रेल्वे दररोज सुरू करावी, तिला दूधसागर येथे थांबा द्यावा, यासह इतर खात्यांच्या मागण्याही मांडल्या, असे तानावडे म्हणाले.

दिल्लीत झालेल्या भाजपच्या केंद्रीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतांचे लक्ष्य ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

याबाबत तानावडे म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते भाजपला मिळाली होती. यावेळी त्यापेक्षा अधिक मते मिळतील, तसेच दोन्ही जागा भाजपला मिळतील, यात वाद नाही.

कायदेबदलामुळे वेळेवर न्याय

देशात १८७८ मधील ब्रिटिशकालीन कायद्यांचा वापर गेली अनेक वर्षे होत आहे. पण देशाला ज्या पद्धतीचे कायदे हवेत, तसे बदल करून भारतीय न्यायसंहिता व भारतीय नागरिक संहिता असे कायदे बदलले आहेत.

ही प्रक्रिया २०२० पासून सुरू होती. त्यासाठी सुमारे १५८ बैठका झाल्या. त्याला दोन्ही सभागृहांत बहुमताने मान्यता मिळाली. बदललेल्या कायद्यांमुळे पारदर्शकता तसेच वेळेवर न्याय मिळण्यास मदतहोणार आहे.

बातम्यांवर उमेदवारी नाहीच!

राज्यातील काही भाजप नेत्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू केली असली तरी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर ही उमेदवारी मिळत नाही.

प्रत्येकाला उमेदवारीसाठी दावा करण्याचा हक्क आहे. मात्र, पक्षाची संसदीय निवड समिती तो निर्णय घेते, असे तानावडे यांनी ठणकावून सांगत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेल्या उमेदवारांना कानपिचक्या दिल्या.

अधिसूचनेनंतर उमेदवार जाहीर

राज्यात लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप बहुमताने जिंकेल, तर केंद्रात पक्षाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा तानावडे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीबाबत पक्षपातळीवर प्रक्रिया झाली असली तरी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतरच उमेदवार चाचपणी सुरू केली जाईल. राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचे उमेदवार पक्षाचे संसदीय मंडळ ठरवणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com