Yuri Alemao : कर्नाटक पराभवानंतर भाजपला आली म्हादईची आठवण

डीपीआर मागे घेण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारला भाग पाडा : युरी आलेमाव
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

कर्नाटकातील भाजपच्या पराभवाने गोव्यातील भाजप जागी झाली अन् केंद्राने कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाचा मंजूर केलेला डीपीआर बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार झाला.

गोवा भाजपने मगरीचे अश्रू ढाळणे थांबवावे आणि कळसा भंडुराचा डीपीआर मागे घेण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारला भाग पाडा अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे

गोव्यातील भाजपच्या राज्य कार्यकारिणी समितीने मंजूर केलेल्या राजकीय ठरावावर आलेमाव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Yuri Alemao
Mahadayi Water Dispute: म्हादई वाचवण्यासाठी घराबाहेर पडून आंदोलनाचे समर्थन करावे

गोव्यातील भाजप जर गंभीर असेल तर त्यांनी दिल्लीतील पहिल्या ट्रबल इंजिनवर कळसा भंडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मान्यता मागे घेण्यासाठी आणि यथास्थिती कायम ठेवण्यासाठी दबाव आणावा.

भाजपने जुमला राजकीय विधाने करून जनतेला मूर्ख बनवण्याचे दिवस आता संपले आहेत. भाजप कार्यकारिणीचा ठराव पूर्णपणे राजकीय असून त्यात प्रामाणिकपणाचा अभाव आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

"भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने गोव्यातील खाणकामांच्या प्रत्यक्ष सुरुवातीची तारीख जाहीर करण्याचे का टाळले? भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्यांनी काही खाण ब्लॉक्सचा ई-लिलाव झाल्यानंतरही गोव्यात खाणकामास प्रत्यक्ष सुरूवात होण्यास कोणते अडथळे येणार यावर गृहपाठ करणे आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Yuri Alemao
Sagar Parikrama: केंद्रीय मंत्री रूपाला यांनी वास्को जेट्टीची घेतली दखल; 'सागर परिक्रमा' यात्रा गोव्यात दाखल

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन प्रस्तावात "अभूतपूर्व जनादेश" हे शब्द वापरायला भाजपला लाज वाटली पाहिजे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ 32 टक्के मते मिळाली आणि सरकारने विश्वासघातकी आणि पक्षांतर करणाऱ्यांच्या मदतीने जनतेचा जनादेश लुटला असे युरी आलेमाव म्हणाले.

भाजपच्या कार्यकारीणी ठरावातील राज्यात नियोजित G20 गट बैठकींच्या उल्लेखावर आपली प्रतिक्रिया देताना, युरी आलेमाव यांनी "भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग (चोगम) च्या रिट्रीटचे आयोजन करून गोव्याला आंतरराष्ट्रीय स्थरावर नेले होते हे भाजपने समजून घेतले पाहिजे असा सल्ला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com