Goa BJP State President: भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच! सात जणांनी व्यक्त केली इच्छा; दिल्ली दरबारी होणार अंतिम फैसला

BJP State President Selection: भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी चक्क सात जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. शुक्रवारी (3 जानेवारी) रात्री दिल्लीत या पदासाठी ७ नावे पाठविण्यात आली आहेत.
Goa BJP State President: भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच! सात जणांनी व्यक्त केली इच्छा; दिल्ली दरबारी होणार अंतिम फैसला
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी चक्क सात जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. शुक्रवारी (3 जानेवारी) रात्री दिल्लीत या पदासाठी ७ नावे पाठविण्यात आली आहेत. सर्वांत शेवटी गोविंद पर्वतकर यांचे नाव कळविण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadananda Shet Tanawade) यांनी सांगितले की, सध्या मंडळ पातळीवरील अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी उत्तर गोव्‍यासाठी ॲड. मनोहर आडपईकर, तर दक्षिण गोव्यासाठी ॲड. विश्वास सतरकर निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. गुरुवारी म्हापसा आणि मडगाव येथे नेत्यांची मते जाणून घेतली आहेत. त्याची माहिती गाभा समितीच्या बैठकीत आज देण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, समितीचे सदस्य माविन गुदिन्हो, दामू नाईक, रमेश तवडकर, गोविंद पर्वतकर, ॲड. नरेंद्र सावईकर, नीलेश काब्राल, विनय तेंडुलकर, चंद्रकांत कवळेकर आणि दिगंबर कामत उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकार राज्याचा सर्वांगीण विकास कसा करू इच्छीत आहे, याविषयीची संकल्पना मांडली. या बैठकीनंतर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, दामू नाईक, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, गोविंद पर्वतकर यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे विचारार्थ पाठविण्याचे ठरविण्यात आले. पर्वतकर वगळता इतर सर्व सहा नावे एकत्रितपणे कळविण्यात आली, तर पर्वतकर यांचे नाव नंतर कळविले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावावर अद्याप चर्चा सुरू असल्याचे नमूद केले.

Goa BJP State President: भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच! सात जणांनी व्यक्त केली इच्छा; दिल्ली दरबारी होणार अंतिम फैसला
Goa State Debt: सरकारी प्रचार, रोड शोवरील फालतू खर्च थांबवा; बहुतांश मंत्र्यांची कामगिरी खराब

निवडीला १० तारखेनंतरचा मुहूर्त

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह हे ५ जानेवारी रोजी गोव्यात (Goa) येणार आहेत. ते मंडळ आणि जिल्हा समित्यांच्या निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून काम पाहतील. राज्य पातळीवरील निवडणूक अधिकारी म्हणून प्रेमानंद म्हांबरे काम पाहत असून निरीक्षक म्हणून सुनील बन्सल १० रोजी गोव्यात येतील. त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीचे नाव जाहीर केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com