Goa Bjp: गॅस सिलिंडर दरकपातीमुळे सर्वसामान्‍यांना मोठा दिलासा, भाजप प्रवक्तांनी केले मोदीच्या निर्णयाचे स्‍वागत

मोदी सरकारच्‍या निर्णयाचे गोवा राज्‍य भाजपकडून स्‍वागत
Goa Bjp
Goa BjpDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bjp घरगुती वापराच्‍या गॅस सिलिंडरचे दर कमी करण्‍याच्‍या केंद्र सरकारच्या निर्णयाचे राज्य भाजपने स्वागत करतानाच सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा हा निर्णय असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते दयानंद सोपटे, ॲड. यतीश नाईक आणि भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आरती बांदोडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचे स्‍वागत केले.

सोपटे यांनी सांगितले की, कल्याणकारी योजना गरीबांपर्यंत पोचल्या पाहिजेत, या अंत्योदय तत्वाला अनुसरून हा निर्णय घेण्‍यात आला आहे. आता सर्वसामान्यांना 903 रुपयांत तर गरीबांना 703 रुपयांत गॅस सिलिंडर मिळू लागला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभात वाढ करून सगळ्यांनाच दिलासा दिला आहे.

गॅस सिलिंडर दरकपात ही त्‍यात भर घालणारी गोष्‍ट ठरली आहे. ॲड. यतीश नाईक यांनीही केंद्र सरकारच्‍या निर्णयाचा फायदा गोव्‍यातील लाखो लोकांना होणार असल्‍याचे सांगितले.

Goa Bjp
Goa School Girl Molestation: ‘त्‍या’ शिक्षकाने विद्यार्थिनीला पॉर्न क्‍लीप दाखविल्‍याचे उघड, पालकांमध्‍ये संतापाचे वातावरण

आगामी निवडणुका आणि सिलिंडर दरकपात निर्णयाचा संबंध नाही. भाजपने सातत्याने केंद्र व राज्य पातळीवर महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.

काँग्रेसच्या तत्कालीन मंत्री रेणुका चौधरी यांनी सिलिंडरचे दर 900 रुपये झाले होते तेव्हा आणि पत्रकारांनी विषय उपस्थित केला होता तेव्हा ‘सिलिंडर गरीब कुठे वापरतात?’ अशी विचारणा केली होती. आता गरीबही गॅस सिलिंडर वापरतात.

कारण भाजप सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेखाली ते त्यांना शेगडीसह मोफत दिले आहेत. त्यांना ते परवडावेत म्हणून सिलिंडरमागे 400 रुपये दरकपात केली आहे.

- आरती बांदोडकर, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com