Goa School Girl Molestation: ‘त्‍या’ शिक्षकाने विद्यार्थिनीला पॉर्न क्‍लीप दाखविल्‍याचे उघड, पालकांमध्‍ये संतापाचे वातावरण

तत्काळ निलंबन : आठ दिवस पोलिस कोठडी
Goa School Girl Molestation
Goa School Girl MolestationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa School Girl Molestation फातर्पा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्‍याच्‍या आरोपाखाली कुंकळ्‍ळी पोलिसांनी अटक केलेल्‍या रमेश गावकर या पीई शिक्षकाला ‘पाॅर्न क्‍लीप्‍स’ पाहायची सवय होती. यापूर्वी त्‍याने एका विद्यार्थिनीलाही अशी क्‍लीप दाखविली होती, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

आतापर्यंत आठ विद्यार्थिनींनी या शिक्षकाविरोधात पोलिसांत जबान्‍या दिल्‍या असून या शिक्षकाला आज (गुरुवारी) सायंकाळी केपे न्‍यायालयात हजर केले असता त्‍याला आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्‍यात आली. तसेच त्याचे निलंबनही करण्यात आले.

Goa School Girl Molestation
Sanjay School Porvorim: ‘त्या’ दिव्यांगाची प्रकृती चिंताजनक, मुख्यमंत्र्यांकडून घटनेकडे दुर्लक्ष

हा शिक्षक विद्यार्थिनींना शारीरिक शिक्षणाच्‍या नावाखाली दोरीवर उड्या मारायला लावायचा आणि विद्यार्थिनी उड्या मारताना त्‍यांच्याकडे बुभुक्षित नजरेने पाहायचा, अशी जबानी काही विद्यार्थिनींनी पोलिसांना दिली आहे.

या घटनेमुळे फातर्पा येथील त्‍या शाळेतील विद्यार्थ्यांच्‍या पालकांमध्‍ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

या शिक्षकाला अटक करू नये, यासाठी एका राजकारण्‍याकडून पोलिसांवर दबाव आला हाेता. मात्र, पोलिस या दबावाला बळी पडले नाहीत. अशा प्रवृत्तीच्‍या शिक्षकांना मोकळे सोडल्‍यास त्‍यांच्‍यासाठी असे गुन्‍हे करण्‍यासाठी रान मोकळे ठेवल्‍यासारखे होईल. अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत.

- एल्‍टन डिकॉस्‍ता, आमदार, केपे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

maina curtorim police custody torture suspension
gang rape case involving minor girl in Odisha
Girl Accidentally Drinks Acid Kanpur
Ballia School Principal Arrested
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com