Chandrakant Shetye: काम करायचे नसेल, तर घरी बसा

Chandrakant Shetye: डिचोली पालिका बैठक : अधिकाऱ्यांना इशारा
Chandrakant Shetye |Goa News
Chandrakant Shetye |Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Chandrakant Shetye: इमारतीला ऑक्युपन्सी (निवासी) दाखला आणि अन्य काही बेकायदा गोष्टीवरून डिचोली पालिका मंडळाची बैठक पुन्हा एकदा तापली. अधिकारी बेकायदा गोष्टींना उत्तेजन असल्याचा आरोप बहुतेक नगरसेवकांनी करताच, प्रामाणिक काम करायचे नसेल तर घरी बसा, असे खडे बोल आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या अधिकाऱ्यांना सुनावले.

पालिका मंडळाची बैठक नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवारी) पार पडली. या बैठकीस उपनगराध्यक्ष सुखदा तेली यांच्यासह राजाराम गावकर, रियाज बेग, विजयकुमार नाटेकर, सुदन गोवेकर, अनिकेत चणेकर, गुंजन कोरगावकर, दीपा पळ, ॲड. अपर्णा फोगेरी, दीपा शिरगावकर, ॲड. रंजना वायंगणकर आणि तनुजा गावकर हे सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी रोहन कासकर उपस्थित होते. साडे अकरा वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चालली. या बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाले.

प्रकरण दक्षता खात्याकडे सुपूर्द करणार

  • एका इमारतीला नियमबाह्य ऑक्युपन्सी (निवासी) दाखला दिल्याच्या प्रकारावरून गेल्या 23 सप्टेंबर रोजी झालेली पालिका मंडळाची बैठक तापली होती. ऑक्युपन्सी (निवासी) दाखल्याचा हा विषय आजच्या बैठकीत पुन्हा चर्चेत आला. मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे संबंधित इमारतीचे पोस्ट ऑडिट करण्यात आले.

  • पुढील कारवाई झाली नसतानाही संबंधित इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे. हा मुद्दा उपस्थित करून नगरसेवकांनी तांत्रिक विभागातील अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. हे प्रकरण दक्षता विभागाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

  • बाजारातील गाळे आदी विषयावरही गरमागरम चर्चा झाली. रियाज बेग, राजाराम गावकर, नीलेश टोपले, अनिकेत चणेकर, ॲड. अपर्णा फोगेरी, दीपा शिरगावकर, सुदन गोवेकर यांनी विविध मुद्दे उपस्थित केले.

Chandrakant Shetye |Goa News
Government Jobs in Goa: सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध! CM सावंत यांचा इशारा

सामान्यांची अडचण नको

अधिकारी बेकायदा गोष्टी पाठीशी घालतात. क्षुल्लक कारणावरून सामान्य नागरिकांची सतावणूक करतात. असा आरोप बहुतेक नगरसेवकांनी केला. त्यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उठून उभे राहिले.

प्रामाणिकपणे काम करायचे नसल्यास, अधिकाऱ्यांनी घरी बसा, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मोजक्याच लोकांचे हित जपण्यासाठी पालिकेने सामान्य जनतेची अडवणूक करू नये, अशी सूचनाही आमदारांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com