Goa police: गोवा सरकार अमली पदार्थ प्रकरणात अनेकांची धरपकड सुरु आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी देखील पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी, गोव्यातील गैरप्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर आज पेडणे पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक करत सुमारे दहा लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
(Pernem police have arrested two people in a drug case)
मिळालेल्या माहितीनुसार पेडणे पोलिसांनी आज अमली पदार्थ प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी चंद्रभूषण दुवे (38 वर्षे) रा पेडणे, व राजू सिंग रा. थिवी या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 9,40,000 हजाराचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत चंद्रभूषण दुवे (वय 38 ) याला अटक केली. त्याच्याकडे तपासणी केली असता दुवे याच्याकडून 940 ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. याची किंमत 9,40,000 रुपये होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दुवे याला अमली पदार्थ पुरवणाऱ्या राजू सिंग रा. थिवी मुळ हिमाचल प्रदेश याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचे पोलिलसांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.