Goa Leaf Artist: भुईपालचा पर्यावरणप्रेमी सूर्यकांतची राजस्थानात 'पर्णकला'

Goa Leaf Artist: केदारिया गावातील श्री आदर्श शारदा अकादमीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचे धडे दिले.
Suryakant Gaonkar | Goa Leaf Artist
Suryakant Gaonkar | Goa Leaf ArtistDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Leaf Artist: भुईपालचे पर्यावरणप्रेमी सूर्यकांत गावकर यांना वनौषधींचा अभ्यास, नैसर्गिक रंग करणे, पर्यावरणीय देखावे करणे याचा छंदच जडला आहे. आता त्यांनी आपल्या कलाकारीचे सीमोल्लंघन करत थेट राजस्थानातील विद्यार्थ्यांना पर्णकलेचे धडे देऊन प्रशिक्षित केले आहे.

निसर्गातील फळे-फुले आणि पानांपासून सजावट करण्याची कला राजस्थानातील उदयपूर केदारिया गावातील श्री आदर्श शारदा अकादमीमधील मुलांना पर्णकलेची शिकवण दिली. सूर्यकांत यांनी राजस्थानात उपलब्ध असलेल्या निसर्ग साधनांचा वापर करून मुलांना विविध कलाकृती शिकविल्या.

Suryakant Gaonkar | Goa Leaf Artist
Goa Road Guide Line: सावर्शेतील रस्त्यांवर सूचना फलक हवेत!

विवाह कार्य, धार्मिक कार्य असो, सत्तरी तालुक्यातील लोक सूर्यकांत यांना बोलावून नैसर्गिक सजावट करण्यात माहीर असून समाजात एक आदर्श अशी छाप टाकली आहे. सूर्यकांत यांना कार्यशाळा घेण्याची फार आवड. गोव्यात अनेक शाळांमध्ये त्यांनी पर्यावरण, जंगलातील फुले, वनस्पतींचा वापर करून कशी सजावट करता येते, हे मुलांना शिकवतात.

खजूर, केळीची पर्णकला

खजूर, केळी, मका यांची पाने तसेच जंगली झाडांचा वापर करून अकादमीतील मुलांना पर्णकला प्रात्यक्षिकासह शिकविली. सूर्यकांत म्हणाले, मी राजस्थानातील लोक होळीसाठी नैसर्गिक रंग कसे तयार करतात, याची माहिती जाणून घेण्यासाठी गेलो होतो. तेथे या अकादमीत जाता आले. हा एक चांगला कार्यक्रम असून पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती या विषयावर पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम अकादमीमध्ये घेतल्याचे शर्मा यांनी नमूद केले.

Suryakant Gaonkar | Goa Leaf Artist
Goa Maharashtra Liquor: गोव्यातून महाराष्ट्रात दारू आणताय? 'या' कायद्याअंतर्गत होणार सक्त कारवाई

शिक्षकांकडून गावकरांचे कौतुक

प्रकृतीने अनेक झाडे, फुले, फळे दिली आहेत. प्रकृतीने दिलेल्या वस्तूंचा मानवी जीवनात बहुमुल्य उपयोग होतो, याची जाणीव ठेवली पाहिजे. निसर्ग वाचला पाहिजे, असे शर्मा यांनी नमूद केले. येथील शिक्षिका पायलदेवी शर्मा, रितूदेवी शर्मा, बाळकृष्ण शर्मा यांनीही गावकर यांचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com