...तर सरपंच रेडकरची मालमत्ता जप्त करून मृतांना भरपाई देऊ! गोवा खंडपीठाचे ताशेरे: 'अ‍ॅमिकस क्युरीं'चा भरपाईसाठी युक्तिवाद

Goa Nightclub Fire: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मधील भीषण अग्निकांडामुळे गोवा राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणाची सूत्रे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आपल्या हाती घेतली आहेत.
Goa Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मधील भीषण अग्निकांडामुळे गोवा राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणाची सूत्रे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आपल्या हाती घेतली आहेत. सोमवारी न्‍यायमूर्ती अमित जामसंडेकर आणि न्‍या. सुमन श्‍‍याम यांच्‍या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेत स्पष्ट केले की, ‘या दुर्घटनेत सरपंच दोषी आढळल्यास प्रसंगी त्यांची मालमत्ता जप्त करून, तिचा लिलाव करून मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यात येईल.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सरपंच रोशन रेडकर यांच्यावर निशाणा साधताना अ‍ॅमिकस क्युरी म्हणाले की, सरपंचांकडे अधिकार नसतानाही त्यांनी ‘ट्रेड लायसन’ दिले.

त्यांच्याकडे पुरेशी संपत्ती असून, मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची क्षमता त्यांच्यात आहे.’’ यावर न्यायालयाने सहमती दर्शवत म्हटले की, गरज पडल्यास सरपंचांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा पर्याय खुला आहे. या क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा तसेच तिसरे मालक अजय गुप्ता देखील सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Goa Nightclub Fire
Goa Tax Share: गोव्‍याला कराच्‍या वाट्यातून मिळतील 5570 कोटी रुपये! CM सावंतांची स्पष्टोक्ती; ‘कुशावती’साठी 500 कोटींची तरतूद

या प्रकरणात तिघांनाही प्रतिवादी केले असून लुथरा बंधूंना यासंदर्भात नोटीस बजाविली नव्हती. ती नोटीस पुढील दोन दिवसात त्यांना संबंधित पोलिस स्थानकामार्फत बजावण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी दिली.

याप्रकरणी बर्च क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमधून, तर भागीदार अजय गुप्ता याला दिल्लीतून अटक करण्यात आली होती.

भरपाईचा मुद्दा ऐरणीवर

न्यायालयाने नियुक्त केलेले ‘न्यायालयीन मित्र’ (अ‍ॅमिकस क्युरी) यांनी सोमवारी युक्तिवाद करताना सांगितले की, या आगीत मृत्युमुखी पडलेले बहुतेक लोक कर्मचारी होते. हे गरीब कामगार आता न्यायालयात स्वतःची बाजू मांडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपाई मिळवून देणे, ही न्यायालयाची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. क्लबच्या मालकासोबतच स्थानिक प्रशासकीय यंत्रणाही याला जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.

Goa Nightclub Fire
Goa Cyber Crime: गुंतवणूकीतून ज्यादा परताव्याचं आमिष, गोव्यातील एकाला 67 लाखांचा गंडा; केरळच्या भामट्याला बेड्या

कोणाचे काय म्हणणे?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : हा सर्वस्वी पंचायतीचा दोष आहे. बेकायदेशीर सह्या करणारे सरपंच आणि सचिवांवर कारवाई केली आहे.

सरपंच रोशन रेडकर : तांत्रिक बाबी सचिव तपासतात. केवळ मलाच का गोवले जाते? संपूर्ण मंडळाने निर्णय घेतला होता.

सचिव रघुवीर बागकर : मी फक्त सरकारी अधिकारी आहे.

दुर्घटनेचा तपशील

अग्नितांडव : ६ डिसेंबर २०२५ (रात्री ११:४५)

मृत्यू : २५ (२० कर्मचारी आणि ५ पर्यटक)

प्रमुख कारण : डान्सदरम्यान इलेक्ट्रिक फटाक्यांचा वापर

बेकायदेशीरपणा : आपत्कालीन दरवाजांचा अभाव, नियमबाह्य बांधकाम

कारवाई : सरपंच अपात्र, सचिव बडतर्फ, संचालक निलंबित

मालकांसह भागीदारांना अटक आणि कोठडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com