Goa: कुडचिरेत 36 लाख खर्चून गणपती विसर्जन स्थळाचे सौंदर्यीकरण

मये मतदारसंघातील (Maye Constituency) देऊळवाडा- कुडचिरे येथे गणपती विसर्जन स्थळी शेड बांधकाम आणि सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.
Kudchire
KudchireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: मये मतदारसंघातील (Maye Constituency) देऊळवाडा- कुडचिरे येथे गणपती विसर्जन स्थळी शेड बांधकाम आणि सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. गुरुवारी मयेचे आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये (Praveen Zantye) यांच्या हस्ते विधिवत या कामाचा शिलान्यास बसविण्यात आला. ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने सुमारे 36 लाख रुपये खर्चून हे काम करण्यात येणार आहे.

या सोहळ्यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, कारापूर-सर्वणचे जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, वन-म्हावळींगे-कुडचिरे पंचायतीची सरपंच शीतल सावळ, उपसरपंच प्रकाश गावकर, सर्वेश उसपकर अन्य पंच, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष सीताराम सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Kudchire
Goa: डिचोली रोटरी क्लबतर्फे 'स्टेप-अप' कोविड केंद्राला 'मॉनिटर सिस्टिम'

कुडचिरेसह मये मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागली असून, उर्वरित कामांनाही चालना देण्यात येणार. असे आमदार झांट्ये यांनी यावेळी बोलताना सांगितले. विकासकामांसाठी जनतेनेही सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले. शीतल सावळ यांनी स्वागत केले. गणपती विसर्जन स्थळी शेड बांधकाम आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com