Drishti Beach Rescue
Drishti Beach Rescue Dainik Gomantak

Goa Beach Rescue: द्रिष्टीची 'जीव' रक्षक कामगिरी! दोन दिवसांत वाचविले 19 जणांचे प्राण

Drishti Marine Goa: त्यात पाच परदेशी नागरिकांचा समावेश आहे या कालावधीत चार जखमी पर्यटकांना प्रथमोपचार देण्यात आले.
Published on

पणजी: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या आठवड्याच्या शेवटी (शनिवार-रविवार) १९ जणांना जीवरक्षकांनी बुडण्यापासून वाचविले. त्यात पाच परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या कालावधीत चार जखमी पर्यटकांना प्रथमोपचार देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार हरमल येथे कझाकस्तानमधील दोन जोडप्यांनी जीवरक्षक यांच्या सूचना न जुमानता समुद्रात प्रवेश केल्यानंतर सुमारे ५० मीटर अंतरावर त्यांना प्रवाहाने ओढून नेले. टळकर यांनी तत्काळ मदतीसाठी बचाव रेस्क्यू ट्यूबचा वापर केला, तर जीवरक्षक मनोज परब रेस्क्यू बोर्ड घेऊन पोहोचले. त्यानंतर दोघांनी मिळून चारही पर्यटकांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले.

मोरजी येथे एका ५७ व ६० वर्षांच्या रशियन जोडप्याला अचानक आलेल्या समुद्री प्रवाहाने ४० मीटर आत खेचले. दरम्यान,जीवरक्षकांनी त्यांचा आवाज ऐकून लाईफगार्ड टॉवरला बचाव इशारा पाठवला. जीवरक्षकांनी बचाव रेस्क्यू ट्यूबसह जोडप्याची मदत केली आणि त्यांना बचाव फळीवर सुरक्षित बसवून किनाऱ्यावर आणण्यात आले.

पाळोळे येथे पाळोले नदीजवळ फोंड्याच्या एका २८ वर्षीय युवकाला त्याच्या मित्राने बुडण्यापासून वाचवले. जीवरक्षक सर्वेश गोवेकर, प्रदीप वेळीप, अमोल पाईगिणकर आणि समीर कंकणकर यांनी त्याला प्रथमोपचार यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले, ऑक्सिजन दिला आणि स्थिर ठेवून तातडीने वैद्यकीय सेवांकडे सोपवले.

Drishti Beach Rescue
Goa Beach: गोव्याच्या किनाऱ्यांवर सावधान! 2024 मध्ये समुद्रात बुडणाऱ्या 950 पर्यटकांचे 'दृष्टी'ने वाचवले प्राण

कळंगुट किनाऱ्यावर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणाच्या पर्यटकांचा समावेश असलेल्या अनेक जणांना बुडण्यापासून वाचवले. तामिळनाडूतील एका १४ वर्षीय मुलाला राकेश कुमार आणि संजय यादव यांनी प्रवाहातून वाचवले. तसेच, एका गटातील पाच जणांना दोन महाराष्ट्रातील व तीन आंध्र प्रदेशातील जीवरक्षकांनी सुरक्षित बाहेर काढले. या घटनेत एका व्यक्तीच्या बुडण्याच्या प्रयत्नामुळे इतर पाच जणही अडचणीत आले होते.

कांदोळी किनाऱ्यावर ३० वर्षांच्या दोन काश्मिरी युवकांना प्रवाहाने ओढून नेले असता दिवाकर देसाई आणि सूरज सावंत यांनी रेस्क्यू बोर्डचा वापर करून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. जयप्रकाश आणि योगेंद्र सिंह यांनी रेस्क्यू ट्यूब वापरून त्यांना मदत केली.

बागा किनाऱ्यावर एका १३ वर्षीय रशियन मुलीला जीवरक्षक सुशांत गावकर यांनी रेस्क्यू बोर्डच्या मदतीने वाचवले. मांद्रे येथे जयपूरमधील सहा पर्यटकांपैकी पाच जण परत किनाऱ्यावर पोहोचले, मात्र २७ वर्षीय युवक बुडू लागला. यावेळी जीवरक्षक करण टांडेल आणि युवराज रेवणकर यांनी रेस्क्यू बोर्ड व जेटस्कीचा वापर करून त्याला सुरक्षित किनाऱ्यावर आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com