Drishti Lifeguards: मजामस्तीच्या नादात जीवाशी खेळ! ख्रिसमस विकेंड ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी तिघांना वाचवले

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेले देशी पर्यटक अनेकदा जोशात येऊन समुद्रात उतरतात.
Drishti Lifeguards
Drishti LifeguardsDainik Gomantak

Drishti Lifeguards: ख्रिसमस विकेंडमध्ये राज्यात मजामस्ती करण्यासाठी आलेल्या तिघाजणांना ‘दृष्टी’ संस्थेच्या जीवरक्षकांनी समुद्रात बुडण्यापासून वाचवले. उपलब्ध माहितीनुसार मिरामार किनाऱ्यावर पाण्यात खोलवर गेलेली हैदराबाद येथील महिला पाण्यात बुडते आहे, हे लक्षात येताच जीवरक्षकाने तिच्या पतीच्या मदतीने महिलेला सुरक्षित ठिकाणी परत आणले.

Drishti Lifeguards
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात बदल; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती

तसेच सिकेरी किनाऱ्यावर नाशिकचे चार पर्यटक पाण्यात उतरले असता, त्यातील दोघेजण पाण्यात बुडू लागले होते. मात्र, तेथील जीवरक्षक शुभम याने दोघांना किनाऱ्यावर आणले.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेले देशी पर्यटक अनेकदा जोशात येऊन समुद्रात उतरतात. मात्र अशावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अशा जीवघेण्या घटना घडत असतात. जीवरक्षकांनी तत्परता दाखवल्यामुळे या तिन्ही पर्यटकांचे जीव वाचले आणि मोठी हानी टळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com