Goa Beach Shack Policy: संतप्त शॅक व्यावसायिकांचे सडेतोड उत्तर; किनाऱ्याची दुरावस्था शॅक बांधणीमुळे नव्हे तर...

यंदा केरी किनाऱ्यावरही शॅकसाठी परवाने दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Goa Beach Shacks
Goa Beach ShacksDainik Gomantak

Goa Beach Shack Policy मोरजी व मांद्रे समुद्र किनाऱ्यांवर कासवे अंडी घालत असल्याने हे किनारे कासवांसाठी संरक्षित ठेवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याच अनुषंगाने सरकारने मोरजी व मांद्रे किनाऱ्यांवरील शॅकची संख्या मर्यादित केली असतानाच यंदा केरी किनाऱ्यावरही शॅकसाठी परवाने दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक शॅक मालक संतप्त झाले असून आमच्या भविष्याची चिंता सरकारला नाही का? असा त्यांनी उद्विग्नपणे सवाल विचारला आहे.

Goa Beach Shacks
Bull Fight In Goa: उच्च न्यायालयाचा आदेश; 'धिरयो' रोखण्यासाठी पोलिसांचं 'पुढचं पाऊल'...

यंदाच्या हंगामासाठी आम्ही 5-10 लाखांचे सामान आणले असून सरकारच्या या निर्णयामुळे आमच्यावर बेकारीची वेळ येणार आहे किनाऱ्याची दुरावस्था ही शॅक बांधणीमुळे न होता इथे होत असणारा वारेमाप वाळू उपसा याला कारणीभूत आहे.

हा किनारा आणि गाव जर सुरक्षित ठेवायचा असेल तर वाळू उपसा बंद ठेवण्याची गरज असल्याचे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.

Goa Beach Shacks
दिगंबर कामत यांच्‍या नाकर्तेपणामुळे आर्थिक राजधानी मडगावची वाट लागली; सरदेसाई म्हणाले आता पर्याय...

दरम्यान या किनाऱ्याची धूप होऊ नये, यासाठी जलसंपदा खाते तेथे धूप प्रतिबंधक उपाययोजना करणार आहे. त्यासाठी सिमेंटचे त्रिकोणी आकाराचे ब्लॉक समुद्रकिनारे टाकण्यात आले असून यामुळे समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी ते अडचणीचे ठरणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तर स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी या प्रश्नी आपण पर्यटन मंत्र्यांकडे हा विषय मांडणार असून धूप रोखण्याच्या कामकाजात अडथळा न येता शॅक मालकांना त्यांचा व्यवसाय कसा करता येईल यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन दिलंय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com