Goa Shacks : विदेशींत घट, मेपूर्वीच निम्मे शॅक बंद; परवाने विलंबाचा फटका

Goa Shacks :आधीच परवाने देण्यास पर्यटन खात्याने केलेल्या विलंबामुळे शॅक चालकांना यंदाचे वर्षात फारसा फायदा झाला नसल्याचे शॅक चालकांनी सांगितले.
Goa Shacks
Goa Shacks Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Shacks :

पणजी, राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या घटल्याने कळंगुट, कांदोळी व बागा या प्रमुख समुद्रकिनारे वगळता इतर भागातील अर्ध्याहून अधिक शॅक चालकांनी व्यवसायच नसल्याने मे महिन्यापूर्वीच बंद केले.

आधीच परवाने देण्यास पर्यटन खात्याने केलेल्या विलंबामुळे शॅक चालकांना यंदाचे वर्षात फारसा फायदा झाला नसल्याचे शॅक चालकांनी सांगितले.

वर्दळ नसलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्यावेळी हायमास्ट विजेचे दिवे तसेच सुरक्षितात नसल्याने विदेशी पर्यटक तसेच पैसे खर्च करणारे उच्चभ्रू पर्यटक फिरकत नाहीत. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात काहीप्रमाणात व्यवसाय झाला.

Goa Shacks
Goa Statehood Day: सावंत सरकारचा धिक्कार... सरकारी जाहिरातीत घटकराज्य दिनाच्या कार्यक्रमाचा साधा उल्लेखही नाही; अमरनाथ पणजीकर बरसले

ऑक्टोबर ते मे या आठ महिने शॅक व्यवसाय करायला मिळाल्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. काही किनाऱ्यांच्या जवळच रेस्टॉरंट्स तथा हॉटेल्स असल्याने विदेशी पर्यटक सुरक्षा नसलेल्याकिनारी शॅकवर जात नाहीत.

पर्यटन खात्याने तीन वर्षांकरिता या शॅकचे वितरण केले आहे व ते २०२६ पर्यंत आहे. त्यासाठी आकारण्यात येत असलेले शुल्क भरमसाट असून ते कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या शॅक व्यवसायासाठी खात्याने समुद्रकिनाऱ्यावर हायमास्ट दिवे, सांडपाणी निचरा सोय तसेच पाणीपुरवठा पाईपलाईन तसेच किनाऱ्यांवर जाण्यासाठी वाट या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

२०२४ - २५ या सालाकरिता पर्यटन खात्याने ऑगस्ट २०२४ मध्ये परवाने दिल्यास पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ऑक्टोबरपासून शॅक सुरू करण्यास मदत होणार आहे. यावर्षी शॅक सुरू करण्यास परवान्यामुळे विलंब झाल्याने येत्या १० जूनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती खात्याला केल्याची माहिती गोवा शॅक मालक कल्याण संस्थेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी दिली.

पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था करा!

सरकारने सुरक्षिततेबाबत तसेच प्रत्येक किनाऱ्यावर हायमास्ट तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय केल्यास पर्यटक जाण्याचे धाडस करतील. शॅकचा व्यवसाय हा देशातील पर्यटकांवर नव्हे तर विदेशी पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. पर्यटन खात्याने याकडे कटाक्षाने लक्ष देण्याऐवजी दुर्लक्ष करत असल्याची माहिती गोवन पारंपरिक शॅक मालक असोसिएशनचे अध्यक्ष मान्युएल कार्दोज यांनी दिली.

३६० शॅक्सचे वितरण; पण ३४८ जणांनी उभारले.

अंतर्गत भागातील शॅककडे पर्यटकांची पाठ.

सुरक्षा नसल्याने रात्री विदेशी फिरकत नाहीत.

कांदोळी, कळंगुट, बागा किनाऱ्यांवर २०० शॅक.

३१ मे ही ‘शॅक बंद’ची तारीख, तरी काहींचा फेब्रुवारीनंतर व्यवसाय बंद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com