Goa Beach: जीवरक्षकांच्या शौर्याची कमाल; 14 जणांचे वाचवले प्राण, 5 गोमंतकीयांचा समावेश

Drishti Marine Lifeguards: दृष्टी मरिन या खासगी कंपनीच्या जीवरक्षकांनी समुद्रकिनाऱ्यावर आठवड्याच्या शेवटी मोठ्या दुर्घटना होण्यापासून रोखल्या.
Drishti Marine Lifeguards
Drishti Marine LifeguardsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दृष्टी मरिन या खासगी कंपनीच्या जीवरक्षकांनी समुद्रकिनाऱ्यावर आठवड्याच्या शेवटी मोठ्या दुर्घटना होण्यापासून रोखल्या. एकूण १४ जणांना बुडण्यापासून वाचवले. त्यात पाच गोमंतकीयांचाही समावेश होता.

तसेच चार जणांना प्राथमिक उपचार देण्यात आले, तर दोन हरवलेल्या बालकांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत पुन्हा एकत्र करण्यात आले.बागा किनाऱ्यावर एकाच वेळी तिघांना वाचविण्यात आले.

महाराष्ट्रातील २० वर्षे वयाच्या तिघांना जीवरक्षक चंदन गिरी (रेस्क्यू बोर्ड), सौरभ कुमार, आकाश फुलकर (रेस्क्यू ट्यूब) आणि विनोद गावकर (जेट स्की) यांच्या मदतीने किनाऱ्यावर आणण्यात आले. त्याच किनाऱ्यावर मंगळूरुच्या ३८ वर्षीय पुरुषाला जीवरक्षक सुंदव सिंग यांनी वाचवले.

Drishti Marine Lifeguards
Slums In Goa: गोवा झोपडपट्टीमुक्त होणार, वास्को, मडगाव, म्हापशासाठी 'मास्‍टर प्‍लॅन' तयार; अनैतिक प्रकारांना बसणार चाप

गोव्यातील दोन युवक (वय २८) आणि बिहारमधील ३० वर्षीय पुरुष फ्रिसबी खेळताना लाटांच्या प्रवाहात अडकले तर त्यांना जीवरक्षक भीकास वेळीप आणि शेखर वेळीप यांनी बाहेर काढले.

मांद्रे किनारी म्हापसाच्या ३० वर्षीय पुरुषासह २५ आणि २९ वर्षीय दोन महिलांना प्रबळ लाटांमुळे किनाऱ्यापासून दूर ओढले गेले. त्यांना जीवरक्षक जितान गिराप (रेस्क्यू बोर्ड) आणि विकास मसुरकर (जेट स्की) यांच्या मदतीने किनाऱ्यावर आणण्यात आले.

Drishti Marine Lifeguards
Goa Fraud: 41.54 लाखांची फसवणूक करणाऱ्या रॉड्रिग्ज बंटी बबली विरोधात आरोपपत्र दाखल; इंटरपोल जारी करणार ‘रेड कॉर्नर’ नोटीस

कळंगुट किनाऱ्यावर दोन बचावकार्य केले असून यात महाराष्ट्रातील ३० वर्षीय पुरुष आणि कर्नाटकमधील २७ वर्षीय युवकाचा समावेश आहे. तसेच कळंगुट समुद्रावर हरवलेला ८ वर्षांचा नेपाळी मुलगा कांदोळीत सापडला.

जीवरक्षक जयप्रकाश चक्रवर्ती यांनी त्याची भेट कुटुंबाशी करून दिली. कांदोळीत तामिळनाडू येथील ४० वर्षीय मद्यधुंद पुरुष समुद्रात बुडाला, जीवरक्षक विकास साळगावकर यांनी वेळीच धावून ऑक्सिजन दिला आणि कांदोळी आरोग्य केंद्रावर नेले. कोलवा, माजोर्डा आणि सिकेरी येथेदेखील बचाव मोहीम झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com